आता पर्स, वॉलेटमध्ये झंझट नाही! गुगलने आणलं नवं कोरं खास फिचर जाणून घ्या सविस्तर…

wallet Google क गुड न्यूज आली आहे. ती म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवण्याची गरज नाही.

Wallet Google

Wallet Google

Now no more hassle with purse and wallet Google has introduced a new special feature, know the details : जर तुम्ही नेहमीच तुमच्या पर्स किंवा वॉलेटमध्ये तुमचे आधार कार्ड आणि तर डॉक्युमेंट्स ठेवून वैतागला असाल किंवा हे ठेवायला तुम्ही कधीतरी विसरत असाल आणि यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर आता हे टेन्शन तुम्ही विसरा. कारण एक गुड न्यूज आली आहे. ती म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवण्याची गरज नाही. यासाठी गुगल वॉलेटने एक खास फीचर आणलं आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड डिजिटली सुरक्षित ठेवू शकाल. ज्यामुळे ओळख आणि व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्वीपेक्षा सुलभ गतिशील आणि सुरक्षित होईल. हे फीचर नेमकं कायं? पाहुयात सविस्तर…

गुगलची युआयडीएआयशी पार्टनरशिप

गुगलने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच युआयडीएआयसोबत पार्टनरशिप केली आहे. त्या अंतर्गत भारतामधील युजर्स त्यांचे आधार कार्ड, त्याची माहिती थेट गुगल वॉलेट ॲपमध्ये सेव्ह करू शकतील. या नव्या फीचर्सचा उद्देश हा व्हेरिफिकेशनला आणखी सोप्प आणि सुलभ बनवणं हा आहे. जेणेकरून लोकांना प्रत्येक ठिकाणी फिजिकली आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही.

10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांना उन्हाचा ‘शॉक’; वाढत्या पाऱ्यामुळे डिलिव्हरी मॉडेल कोलमडलं!

याबाबत सांगताना गुगलकडून माहिती समोर आली आहे की, त्यांचे युजर्स आता व्हेरिफायबल क्रेडेन्शियलच्या रूपात मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात. म्हणजे आधार कार्डची सर्व माहिती सुरक्षितपणे फोनमध्ये स्टोअर राहील आणि गरज पडल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने वेरिफिकेशनसाठी ती वापरली जाऊ शकेल.

आधार कार्ड गुगल वॉलेट ला कसे सेव करायचं?

Google वॉलेटमध्ये आधार कार्ड सेव करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला युआयडीएआयमध्ये रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीवरून व्हेरिफिकेशन करावा लागेल. त्यासाठी सगळ्यात पहिले google वॉलेटचं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. त्यानंतर गुगल वॉलेट ॲप ओपन करून त्यावरील होम स्क्रीनवरील प्लस किंवा अॅड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या मेन्यूमधून आयडी पास किंवा आधार कार्ड ऍड करण्याचा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून आधारचे डिटेल व्हेरिफाय करता येतील.

शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही पण विधानपरिषद दिली तर…, बच्चू कडूंकडून भूमिका स्पष्ट

त्यासाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी लागेल तो टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन जाईल जर तुम्हाला नवीन अपडेट यूआयडीएआय आधार ॲप वापरायचं असेल तर तिथून देखील वेरीफायबल क्रेडेन्शनच्या रूपामध्ये जनरेट करून शेअर आयडी ऑप्शनच्या माध्यमातून थेट गुगल वॉलेटमध्ये तुम्ही जोडले जाऊ शकाल व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल आधार कार्ड गुगल वॉलेटमध्ये सुरक्षित आणि इन्क्रिप्टेड फॉरमॅटमध्ये सेव्ह झालेला दिसेल.

Exit mobile version