राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार थेट जनतेपर्यंत पोहोचवणार! केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
National Film Awards केवळ एका कॉन्फरन्स रूमपुरते मर्यादित न ठेवता ते थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
National Film Awards to be taken directly to public Union Minister Ashwini Vaishnaw shares details : एकता नगर आज जगभरात प्रसिद्ध आहे. सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळी जेव्हा माननीय राष्ट्रपती स्वतः तसेच देशभरातील चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहतील, तेव्हा या पर्यटनस्थळाबद्दल अधिकाधिक लोकांना जाणून घेण्याची संधी मिळेल.
देविका दफ्तरदार भावस्पर्शी भूमिका असलेल्या “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच!
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केवळ एका कॉन्फरन्स रूमपुरते मर्यादित न ठेवता ते थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या पुरस्कार सोहळ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा आमचा मानस आहे.
दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा
देशातील सर्व राज्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या राज्यातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांची प्रस्तावना सादर करावी. त्या ठिकाणी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सर्वांगीण विकासाचा ३६० अंशांचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. ज्या राज्याचा प्रस्ताव निवडला जाईल, त्या राज्यातील संबंधित पर्यटनस्थळी पुढील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केला जाईल.
दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेचे आयोजन करताना हा उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात आणि विविध राज्यांमध्ये नेला. आता त्याच धर्तीवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देशातील विविध भागांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपट आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांना एकत्र कसे जोडता येईल, याचा हा व्यापक विचार आहे. चित्रपट आणि पर्यटनाची सांगड घातल्यामुळे संबंधित पर्यटनस्थळाला मोठा फायदा होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनाही कॉन्फरन्स रूमच्या चौकटीबाहेर काढून प्रत्यक्ष पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचवता येईल.”