Download App

उमेदवारांनो, खुशखबर! पनवेल महापालिकेच्या भरतीसाठी अर्ज करायला मुदतवाढ, आता ‘ही’आहे शेवटची तारीख

  • Written By: Last Updated:

Panvel Municipal Corporation Recruitment : तुम्हाला पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करायचा होता का? आणि अंतिम मुदत संपल्यामुळे तुम्ही अर्ज करू शकला नाही नसाल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळणार आहेत.

पनवेल महापालिकेच्या आराखड्यानुसार विविध ४२ पदांसाठी ३७७ जागांवर मेगा भरती सुरू आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १ लाख १५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच यापैकी ४८ हजार ५०० उमेदवारांनी कागदपत्रांसह संपूर्ण अर्ज वेबसाईटवर सादर केले आहेत. उमेदवारांचा उदंड प्रतिसाद पाहून पालिकेने या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी या भरतीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती परंतु आता उमेदवार 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रियेतील 377 जागांसाठी पदे-
गट ‘अ’ पदे:
प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, क्षयरोग अधिकारी, मलेरिया अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी.

गट ‘ब’ पदे:
नगर उपसचिव, महिला व बालकल्याण अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहायक नगरपालिका अधिकारी नियोजनकार, सांख्यिकी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.

गट ‘क’ पदे:
हाफ फायर स्टेशन ऑफिसर, लीडिंग फायरमन, फायरमन, ड्रायव्हर कम ऑपरेटर, फार्मासिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, स्टाफ नर्स (जनरल नर्सिंग मिडवाइफरी), असिस्टंट नर्सिंग मिडवाइफरी, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (कॉम्प्युटर), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य).

Maratha Reservation बद्दल सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील; ‘त्या’ व्हिडीओवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण… 

गट ‘क’ मधील इतर पदे:
हार्डवेअर/नेटवर्किंग), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सहाय्यक कायदा अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहाय्यक क्रीडा अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघुलेखक – टायपिस्ट, लघुलेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा) , कनिष्ठ लिपिक (ऑडिट), टायपिस्टसह लिपिक, चालक (जड वाहन), चालक (हलके वाहन), वॉलमन/की-कीपर, गार्डन पर्यवेक्षक.

गट ‘ड’ पोस्ट:
माळी गट ड.

वय श्रेणी :
खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे.
राखीव प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे.

नोकरी ठिकाण: पनवेल, रायगड.

अर्ज फी:
गट अ आणि गट ब: खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/ आरक्षित वर्गासाठी रु. 900.
गट क: खुला वर्ग रु. 800/ राखीव श्रेणी रु. 700.
गट ड: खुला प्रवर्ग रु. 600, राखीव वर्ग रु. 500.

उमेदवार http://www.panvelcorporation.comhttps://mahadma.maharashtra.gov.inhttps://mahadma या वेबसाइटवर जाऊ अर्ज करू शकातत. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महापालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला. काही शंका असल्यास 022-27458042 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे

 

Tags

follow us