Download App

PCMC Recruitment 2023 : 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू

  • Written By: Last Updated:

PCMC Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत बालवाडी शिक्षक (Kindergarten teacher) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 ची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ या.

Sonu Sood: ‘फतेह’चं शूटिंग संपताच सोनू सूदची खास सफर 

पदाचे नाव – बालवाडी शिक्षक.

एकूण रिक्त पदे– 21

शैक्षणिक पात्रता –
बालवाडी शिक्षक पदासाठी उमेदवार हा 10वी पास पास असावा. सोबतच त्याने बालवाडी सेविका किंवा बालवाडी शिक्षक म्हणून 6 महिने किंवा 1 वर्षाचा मान्यताप्राप्त संस्थेतून कोर्स केलला असावा. + 2 वर्षांचा अनुभव.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग, मागास प्रवर्ग – माहिती अद्याप उपलब्ध नाही.

आवश्यक कागदपत्रे-
उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता, डिप्लोमा आणि पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.

अधिकृत वेबसाइट – https://www.pmc.gov.in/mr

अर्ज करण्याचा पत्ता – जुना ड वॉर्ड ऑफिस, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरगाव.

अर्ज सादर करण्यास सुरुवात – 1 नोव्हेंबर 2023 सकाळी 10 वाजता.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.

उमदेवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन वाचावे. नंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करतांना काही चुका झाल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमदेवांनी नोंद घ्यावी. विहित मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जचा विचार केला जाणार नाही. ईमेल अथवा पोस्टच्या माध्यमातून येणाऱ्या अर्जांना ग्राह्य धरले जाणार नाही.

निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही सोयी सुविधा (दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान) मिळणार नाही. सदरची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वारूपाची आहे.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1TWPt7skmg__OnK4VUtfl-xTJ6FbfgG9B/view

Tags

follow us