Download App

Phone Blast Issue : सावधान! तुमच्यापण फोनचा स्फोट होऊ शकतो…

How To Prevent Phone Overheating : फोनचा स्फोट  (Phone Blast Issue) झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या कानावर पडतात. यामुळे अनेकदा आर्थिक अन् शारिरीक नुकसान देखील होते. परंतु याचे कारण अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. खरं तर फोन जास्त गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट होतो, असं तज्ज्ञ सांगतात.

आपण अनेकदा स्मार्टफोन (Smartphone) गरम होत असल्याची तक्रार करतो. खरंतर स्मार्टफोनमध्ये जास्त गरम होण्याची समस्या सामान्य आहे, पण जास्त गरम होणे देखील धोकादायक आहे. कारण त्यामुळे फोनचा स्फोट होण्याचा धोका (Phone Blast Issue) आहे. आपला फोन सामान्य तापमानात कसा ठेवू शकतो, फोन जास्त गरम होण्याची समस्या का (Phone Overheating) येते? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.

मोठी बातमी! पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, बेल्जियम पोलिसांची कारवाई

फोन जास्त गरम होण्याची समस्या का येते?

1. सूर्यप्रकाशात फोन (Smartphone) लवकर गरम होतो.
2. कधीकधी अनेक वेगवेगळे अ‍ॅप्स चालवल्यामुळे फोन गरम होऊ शकतो. त्याच वेळी, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा जास्त वेळ गेम खेळल्याने CPU आणि GPU वर दबाव येतो. यामुळे फोन गरम होतो.
3. जर तुम्ही तुमच्या फोनची ब्राइटनेस (Phone Overheat Issue) जास्त ठेवली असेल, तर त्यामुळे तो गरम होऊ शकतो.
4. हानिकारक सॉफ्टवेअरचा फोनवर वाईट परिणाम होतो आणि फोन गरम होतो.
5. आपल्याला आपला फोन चार्ज करण्यासाठी कोणाकडूनही चार्जर मागण्याची सवय आहे, फोन गरम होण्याचे हे एक मोठे कारण आहे. दुसऱ्या फोनच्या चार्जरने फोन चार्ज केल्याने जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते.

Ambedkar Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती; त्यांच्या जीवनाशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या…

फोन जास्त गरम होण्याची समस्या टाळण्यासाठी काय करावे?

1. फोन सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
2. स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा.
3. अनावश्यक अॅप्स बंद करा.
4. फोन चार्ज करताना फक्त तुमचा चार्जर वापरा.
5. गरज नसल्यास फोनचे ब्लूटूथ, जीपीएस इत्यादी बंद ठेवा.
6. जर तुम्ही बराच वेळ गेमिंग किंवा स्ट्रीमिंग करत असाल तर प्रोसेसर थंड होण्यासाठी मध्येच ब्रेक घ्या.

फोन जास्त गरम होण्यापासून वाचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे फोन गरम झाल्यावर 10 किंवा 15 मिनिटांसाठी बंद करणे. तो पूर्णपणे थंड झाल्यावर पुन्हा चालू करा.

 

follow us