भारीच! अखेर भारताने अमेरिकेला पछाडलेच; ‘या’ बाबतीत भारत जगात दुसरा, जाणून घ्याच

Smartphone Use in World : आजच्या काळात स्मार्टफोन प्रत्येक (Smartphone) माणसाची गरज बनला आहे. कोणतेही काम असो स्मार्टफोन शिवाय पूर्ण होत नाही. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसा स्मार्टफोनचा वापर वाढत चालला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज स्मार्टफोन वापरला जातो. श्रीमंत आणि विकसित देशांत प्रमाण जास्त आहे तर गरीब आणि विकसनशील देशांत प्रमाण कमी आहे. पण बहुदा प्रत्येक देशात स्मार्टफोन आहेच. आज याच निमित्ताने जाणून घेऊ की कोणत्या देशात सर्वाधिक स्मार्टफोन वापरले जातात.
चीन जगात अव्वल
तसं पाहिलं तर आजमितीस चीनमध्ये सर्वाधिक स्मार्टफोन (Smartphone in China) युजर्स आहेत. चीनची लोकसंख्या जास्त आहे आणि लोक टेक्नोलॉजीचा (Technology) वापर वेगाने करत आहेत. एका रिपोर्टनुसार चीनमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करतात. चीनमधील खेड्यापासून थेट महानगरपर्यंत सर्वच ठिकाणी स्मार्टफोनचा वापर केला जातो.
भारताने अमेरिकेला पछाडले
या यादीत भारताचा दुसरा (Smarphone in India) क्रमांक आहे. भारतात आजमितीस 70 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यामागे काही कारणेही आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात अन्य देशांच्या तुलनेत इंटरनेट खूप स्वस्त आहे. येथे स्मार्टफोनच्या किमतीही कमी आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे. युवकांत स्मार्टफोनची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन क्लासेस आणि डिजिटल पेमेंट्सने स्मार्टफोनला आणखी लोकप्रिय केले आहे.
भारताची लोकसंख्या (India Population) अमेरिकेपेक्षा जास्त आहे. म्हणून भारतात अमेरिकेपेक्षा जास्त स्मार्टफोन युजर्स आहेत. भारतात तंत्रज्ञानाचा विकासही वेगाने होत आहे त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोन युजर्सची संख्या आणखी वाढू शकते. आजमितीस भारतातील अगदी खेडेगावातही स्मार्टफोन वापरले जात आहेत. याठिकाणी इंटरनेटच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत.
काय, तुमचा फोन तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतोय? सावध व्हा, ‘या’ टिप्सने रोखा फोनची हेरगिरी
अमेरिका : कमी लोकसंख्या जास्त स्मार्टफोन युजर्स
स्मार्टफोन युजर्सच्या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 30 कोटींपेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अमेरिकेची लोकसंख्या भारत आणि चीनपेक्षा कमी आहे. पण येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे. येथील प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. आणि या माध्यमातून ई मेल, ऑनलाइन शॉपिंग, एन्टरटेन्मेंटसाठी केला जातो.
भारत आणि अमेरिकेत 40 कोटी स्मार्टफोन युजर्सचे अंतर आहे. अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. चीन, भारत आणि अमेरिका नंतर इंडोनेशिया, ब्राझील, रशिया, जपान यांसारखे देश आहेत. परंतु याबाबतीत चीन आणि भारताला टक्कर देणे या देशांच्या आवाक्याबाहेर आहे.