Post Covid Disease :देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून देशासाह जगभारात कोरोना या आजाराने नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम घडवला आहे.
या आजाराने नागरिकांचं शारिरिक, मानसिक आणि अर्थिक असं सर्व प्रकारचं नुकसान झालं आहे. मात्र आता यामध्ये आणखी एक धोका समोर आला आहे. तो म्हणजे कोरोनानंतर आता लोकांमध्ये इतरही काही आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यातून रूग्णांचं शरिर विविध आजारांनी खिळखिळ झालं आहे. यामध्ये ह्रदयविकाराचा झटका येणे, श्वसनाचे आजारांचा धोका, मानसिक संतुलन बिघडणे, हायपरटेंशनची समस्या. यांचं प्रमाण वाढलं आहे.
1. ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढले :
कोरोनाने अनेक रूग्णांचं ह्रदय कमकुवत झालं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनाने कोरोनरी आर्टरी म्हणजे ह्रदयाला ब्लड सप्लाय करणारी नस, मांसपेशी कमकुवत होतात. त्यामुळे लग्नाच्या वरातीत नाचताना, काम करताना, व्यायाम करताना अनेकांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळत आहे.
2. श्वसनाचे आजारांचा धोका वाढला :
कोरोना झालेल्या रूग्णांमध्ये फुफ्फुसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. फुफ्फुसांची पटलं कमकुवत झाल्याने कोरोना आणि त्यानंतर आजही त्यांना श्वास घेताना त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे. थोड चाललं, काम केलं की या लोकांना श्वास वाढतो. तर कोरोना संक्रमित लोग अस्थमॅटिक, ब्रोकाइंटिस आणि क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (सीओपीडी) चे रूग्ण झाले आहेत.
Maharashtra Corona Update : कोरोनाचं सावट अधिक गडद; 24 तासांत 900 रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू
3. मानसिक संतुलन बिघडण्याचं प्रमाण वाढलं :
कोरोनाचा लोकांच्या मानसिक स्वास्थ्यवर परिणाम झाला आहे. कोरोनानंतर 40 टक्के मानसिक संतुलन बिघडलेल्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये लोक घरीच होते. त्यामुळे डिप्रेशन, एंग्जाइटी, मेमोरी लॉस यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.
4. हाइपरटेंशनची समस्या वाढली :
अधिक तणावात राहणाऱ्या, खाण-पीन व्यवस्थित नसणे, रूटीन फॉलो न करने यामुळे कारण हाय ब्लड प्रेशर म्हणजे हाइपरटेंशनच्या समस्या वाढतात. त्यामुळे ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढले आहे.