Download App

पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज

  • Written By: Last Updated:

Powergrid Recruitment 2023 : जर तुम्ही ITI मधून शिक्षण घेतले असेल आणि प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या संधीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ती म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Powergrid Corporation of India Limited) येथे कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Junior Technician Trainee) पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Girish Mahajan : ‘आता माझ्यासाठी खडसेंचा विषय बंद’; मोजक्याच शब्दांत महाजनांचा फुलस्टॉप !

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023 अर्जाची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिशियन).

एकूण – रिक्त 203 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI (इलेक्ट्रिशियन)

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 27 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी – रु 200.
मागासवर्गीय/माजी सैनिक/पीडब्ल्यूडी- फी नाही.

वेतन: 21 हजार 500

राऊत साहेब, औकात काढू नका सरंपचाच्या निवडणुकीतही तुम्हाला..; CM शिंदेंवरील टीका दरेकरांना झोंबली 

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाइट – https://www.powergrid.in/

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 22 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1mMA0KFCdo7wYU1-vDgiELbCmsSX0GF5L/view

अर्ज प्रक्रिया: या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन माध्यमातून करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 12 डिसेंबर 2023 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज करतांना अर्जासह आवश्य़क त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. उशीरा आलेले आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

Tags

follow us