Railway Recruitment Board 2024 : रेल्वे भर्ती बोर्डाने पाच हजारांहून अधिक असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 20 जानेवारीपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार RRB च्या वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
आमच्या आरक्षणावर डोळा ठेवला तर तुमची आमदारकी, खासदारकी घेऊ; पडळकरांचा इशारा
या भरतीअंतर्गत असिस्टंट लोको पायलटची एकूण 5996 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार संबंधित क्षेत्रात आयटीआय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 20 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी
ओबीसी महा एल्गार मेळाव्याला विजय वडेट्टीवारांसह राम शिंदेंची दांडी
किती पगार मिळेल?
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 19 हजार 900 रुपये मानधन दिले जाईल.
लवरकच 9000 पदांसाठी भरती
याशिवाय, रेल्वे विभागाकडून आणखी एक भरतीची अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी 10वी पास, ITI आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच RRB ने नुकतीच एक तात्पुरती टाईमलाईन असलेली अधिकृत नोटीस जारी केली आहे. यानुसार, रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) या पदासाठी भरती सुरू होणार आहे. तसेच, या पदासाठी एकूण 9000 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. या महिन्यात उमेदवारांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, इच्छुक उमेदवार https://Indianrailways.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज करू शकतील. तसेच ऑनलाइन अर्ज सादर करणे मार्चमध्ये सुरू होईल आणि एप्रिल 2024 मध्ये संपेल.
त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची संगणक आधारित चाचणी (CBT) परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान घेतली जाईल. तसेच, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, फेब्रुवारी 2025 च्या उमेदवारांसाठी एक शॉर्ट लिस्ट जाहीर केली जाईल.
या भरती प्रक्रियेच्या तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी Indianrailways.gov.in या वेबसाईटवर र लक्ष ठेवतात. Indianrailways.gov.in वर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व तपशीलवार माहिती उमेदवारांना सहज मिळेल.