ओबीसी महा एल्गार मेळाव्याला विजय वडेट्टीवारांसह राम शिंदेंची दांडी
Ahmednagar OBC Mahaelgar Melava : अहमदनगर (Ahmednagar)शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (clara bruce high school ahmednagar)आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे. या मेळाव्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असलं तरी या मेळाव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar), आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी मात्र ऐनवेळी दांडी मारली आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी अनेक ओबीसी नेत्यांचे पोस्टर्स लावले आहेत. मात्र काही नेत्यांनी या मेळाव्याकडं कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Chhagan Bhujabal : मराठा समाजाला आरक्षण मिळालं मग सर्वेक्षण कसलं? भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावरील मेळाव्याला दीड ते दोन लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे मैदान भरलेलं पाहायला मिळत आहे. या महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर , आमदार प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड , शब्बीर अन्सारी, पी.टी चव्हाण , दौलत शितोळे, सत्संग मुंडे, लक्ष्मण हाके या ओबीसी (OBC) नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती. असं असलं तरी काही ओबीसी नेत्यांनी मात्र या महा एल्गार सोहळ्याकडं कानाडोळा केल्याचं पाहायला मिळत आहे. हा उपस्थित ओबीसी बांधवांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
Chhagan Bhujbal यांच्या मागे खंबीर उभे राहा अन् हा राग इलेक्शनमध्ये काढा; जानकारांचे ओबीसींना आवाहन
शहरात आयोजित ओबीसी महा एल्गार सभेसाठी संपूर्ण शहरातील रस्ते पिवळ्या झेंड्यांनी सजल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यभरातून या मैदानावरील महा एल्गार सभेला ओबीसी बांधवांनी उपस्थिती दर्शवली आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी सात वेगवेगळ्या समित्या गठित केल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 500 स्वयंसेवक तैनात आहेत.
या समित्यांमध्ये पाणीवाटप समिती, पार्किंग समिती, वाहतूक नियमन समिती, आरोग्य समिती ,नाश्ता वाटप समिती, मुख्य स्टेज नियोजन समिती यांचा समावेश आहे. मेळावा परिसरामध्ये तीन कार्डीयाक रुग्णवाहिकांसह पाच रुग्णवाहिका असतील, ठिकठिकाणी मेडिकल किटचे वितरण करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सात ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.