Chhagan Bhujbal यांच्या मागे खंबीर उभे राहा अन् हा राग इलेक्शनमध्ये काढा; जानकारांचे ओबीसींना आवाहन
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये जानकार बोलत होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रस्ताव; सहमती होईल का?
यावेळी बोलताना जानकार म्हणाले की, अहमदनगरमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे मी अभिनंदन करतो. तसेच ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, छगन भुजबळांच्या मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा.
Ulhasnagar Ganpat Gaikwad Firing : महेश गायकवाड अन् गणपत गायकवाड यांच्यात नेमका वाद आहे तरी काय?
तसेच माझी प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ यांना विनंती आहे की, ओबीसींचे 17 नेते नको एकच नेता करा आणि त्याला बाप माना. कारण बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाले ते नाभिक समाजाचे होते. लालूप्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, मायावती त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींचा मुख्यमंत्री हवा. कारण महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र इलेक्शनमध्ये हे दाखवून द्यावे लागेल.