जमिनीचा वाद की, उमेदवारीची इर्षा; महेश गायकवाड अन् गणपत गायकवाड यांच्यातील वाद काय?

जमिनीचा वाद की, उमेदवारीची इर्षा; महेश गायकवाड अन् गणपत गायकवाड यांच्यातील वाद काय?

Ulhasnagar Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar)भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)यांनी शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group)नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad )यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. आता त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यातच गोळीबार केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला आहे. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडला आहे. पण हे सर्व घडत असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यात नेमका काय वाद आहे? हेच जाणून घेऊया.

इम्रान खानच्या पत्नीला 7 वर्षांची शिक्षा, लग्नाला ठरवले ‘गैर-इस्लामिक’

मिळालेल्या माहितीनुसार एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरु होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरु होता. मागील तीन दिवसांपासून हा वाद सुरु होता. हिल लाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावलं होतं. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सु्मारास दोघांतील वाद विकोपाला गेला.

यशस्वी जैस्वालचा ‘डबल धमाका’, बुमराहचा विकेटचा ‘षटकार’; भारताकडे भक्कम आघाडी

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या.

जमिनीवरुन वाद
महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात राजकीय शितयुद्ध अनेक दिवसांपासून सुरु असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उल्हासनगर द्वारली गावातील जमिनीवरुन वाद झाला होता. त्या जागेवर गणपत गायकवाडांकडून बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाडली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं होतं. त्याचवेळी पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. यावेळी आमदार गायकवाड यांनी सहा गोळ्या फायर केल्या. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात गोळीबार झाल्याने जनसामान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

महेश गायकवाड कोण आहेत?
महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. तरुणांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये शहरामध्ये राजकीय वाद देखील आहे. विविध कारणास्तव ते दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांच्या एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता महेश गायकवाड हे आमदार गणपत गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. राजकीय वादाची किनारदेखील या घटनेला कारणीभूत असल्याचीही चर्चा जनसामान्यांमध्ये सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज