गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सेटलमेंन्ट, पोलिसांवर दबाव…; भाजप आमदार गोळीबार प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल

  • Written By: Published:
गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सेटलमेंन्ट, पोलिसांवर दबाव…; भाजप आमदार गोळीबार प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra awhad on Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवा (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सहा गोळ्या काढल्या आहेत. या गोळीबारावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनीही यावर प्रतिक्रिया दिला. आव्हाड यांनी पोलीस प्रशासनावरच सवाल उपस्थित केले.

यशस्वी जैस्वालचा ‘डबल धमाका’, बुमराहचा विकेटचा ‘षटकार’; भारताकडे भक्कम आघाडी 

आज माध्यमांशी बोलतांना आव्हाड म्हणाल की, गणपत गायकवाड यांनी केलेले कृत्य अत्यंत चुकीचे आहे. मी या घटनेचे अजिबात समर्थन करणार नाही, हे मानवजातीसाठी अशोभनीय कृत्य आहे. मात्र हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तसेच गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. एखाद्या व्यक्तीला हतबल होऊन हे पाऊल उचलावं लागत आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणीही सुरक्षित नसल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Saqib Saleem: साकिब सलीमने रचला इतिहास, पटकावला ‘पॉवरहाऊस परफॉर्मर’चा पुरस्कार 

आव्हाड पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारांना अभय देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सेटलमेंन्ट केलं जात आहे. त्यामुळे ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे. एखादा पीए किंवा राजकारणी येतो आणि पोलिसांना फोन करतो. त्यांच्यावर दबाव टाकला जातो. सर्व काही सेटलमेन्ट केलं जातं, असा आरोप आव्हाड यांनी केला. त्यामुळं आम्हीही अस्वस्थ आहोत. काही पोलिसांमुळे संपूर्ण डिपार्टमेन्टचं नाव कलंकित झाले आहे. अशोक चक्राच्या शपथा या सर्व खिडकीबाहेर फेकल्या गेल्या आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करायचं काम होत आहे. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही छळवणूक ठाण्यात सुरू झाली आहे. त्यामुळं ठाण्यामध्ये असा एखादा गणपत गायकवाड तयार होतो.

पोलीस आयुक्तांना आपण काही म्हटलं तर ते म्हणतात की, उपरसे फोन आता है. हे मी स्वत: अनुभवलं. पोलिस स्वत:हून खटला कुठेतरी घेऊन जातात. त्याविषयीचे खोटे पुरावे गोळा करतात. त्यामुलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी आव्हाडांनी थेट एसीपी काबदुले यांचंही नाव घेतलं.

गणपत गायकवाडच्या मुलाला मारणार हे त्याला कुणीतरी सांगितलं होत. त्या परिस्थितीत तो पोलिस ठाण्यात गेला होता, त्यानंतर ही घटना घडली, असं आव्हाड म्हणाले.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube