राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रस्ताव; सहमती होईल का?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रस्ताव; सहमती होईल का?

Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीचे राजकारण केलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. नेमका मुद्दा पकडत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावाचा सहाव्या जागेसाठी विचार करावा, अशी थेट मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सर्वांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा! शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मते वेगळी आहेत.. इतरही येतील. दरम्यान, कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत शाहू महाराजांना विचारण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नाही. तर दुसरीकडे संभाजी राजे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

‘राज्यात गुंडाराज, संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर टीका
दरम्यान, राज्यातील 6 खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत असल्याने राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ज्या खासदारांचा कार्यकाळ संपत आहे, त्यात भाजपच्या तीन, ठाकरे गटातील एक, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील एक आणि काँग्रेसमधील एकाचा समावेश आहे.

गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सेटलमेंन्ट, पोलिसांवर दबाव…; भाजप आमदार गोळीबार प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल

भाजपचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांवर उमेदवार कोण आणि कोणाची नियुक्ती होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

‘ओबीसी नेतेच ओबीसी समाजाला मुर्ख बनवताहेत’; राठोडांनी स्पष्टच सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube