Download App

राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना

LetsUpp | Govt.Schemes

राज्यातील(Maharashtra) अल्पसंख्याक समाजातील (minority community)आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना (Students))व्यवसायाभिमुख(Business oriented), तांत्रिक व रोजगाराभिमुख शिक्षण(Employment Oriented Education) देण्यात यावे यासाठी ही योजना राबविण्यात येते.

उद्धव आणि आदित्य कोणाकोणासमोर रडले… लवकरच गौप्यस्फोट करणार

योजनेसाठी आवश्यक अटी :
▪ अर्जदार अल्पसंख्यांक समाजातील असावा. मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिष्ट व जैन समाजाचा समावेश.
▪ अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
▪ वयोमर्यादा किमान १६ ते ३२ वर्षे असावे.
▪ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी १ लाख ३ हजार रुपयांपेक्षा कमी,
▪ ग्रामीण भागासाठी ८१ हजारांपेक्षा कमी.

आवश्यक कागदपत्रे :
● विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या २ प्रती अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
● महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
● आधार कार्ड
● मतदार ओळखपत्र
● पारपत्रक
● बँकेचे पासबुक
● ड्रायव्हिंग लायसन्स
● पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक
● उत्पन्न प्रमाणपत्र : कुटुंबप्रमुखाच्या नावे तहसीलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म क्रमांक १६.
● विहित नमुन्यातील अर्जदार/जामीनदाराचे हमीपत्र
● बेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र

लाभाचे स्वरूप असे : २ लाख ५० हजारापर्यंत कर्ज स्वरूपात दिले जातात.
व्याजदर : ३ टक्के
परतफेड : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यांपासून पुढील ५ वर्षे

या ठिकाणी संपर्क करावा :
▪ अल्पसंख्याक विकास व आर्थिक महामंडळ जिल्हा कार्यालय.
▪ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us