उद्धव आणि आदित्य कोणाकोणासमोर रडले… लवकरच गौप्यस्फोट करणार

  • Written By: Published:
Nitesh Rane

Nitesh Rane : दिशा सालीयन आणि अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आम्हला वाचवा म्हणून कोणाकोणासमोर रडले आहेत. हे मलाही माहिती आहे. तुम्ही आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अन्यथा मी लवकरच याचा गौप्यस्फोट करणार आहे, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना आपण भाजपबरोबर जाऊ नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे रडत रडत शिंदे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी बुधवारी एका मुलाखतीत केला होता.

Letsupp Special : Ajit Pawar यांच्यासोबत किती आमदार? हा आहे आकडा! – Letsupp

आदित्य ठाकरे यांच्या या गौप्यस्फोटाला भाजप आमदार नितेश राणे यांनी आव्हान देत उत्तर दिले आहे. नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा मग मी जे आरोप करतोय ते सगळे बाहेर येईल.

अभिनेता सुशांत सिंह आणि दिशा सालीयन प्रकरण असो की अभिनेता दिनो मोरिया यांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कोणाकोणाची माफी मागत होते, रडत होते. हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गौप्यस्फोटाच्या नावाखाली बदनाम करत आहे. हेच मी वरील प्रकरणात गौप्यस्फोट केला तर तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही, असा इशाराच नितेश राणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube