Download App

Raksha Bandhan 30 की 31 ऑगस्टला? राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

Raksha Bandhan 2023 : हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा सण बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये मुहूर्त, तिथी आणि काळ यांनाही महत्व दिलं जातं. त्यातच यंदाचा रक्षाबंधनचा सण 30 ऑगस्टला साजरा करायचा की 31 ऑगस्टला याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि हा सगळा गोंधळ झालाय तो भद्राच्या मुहुर्तामुळे…

गुडन्यूज! घरगुती सिलेंडर आता होणार स्वस्त; 200 रुपयांनी किंमती घटवणार?

आपल्या घरातल्या कॅलेंडरनुसार रक्षाबंधन (Raksha Bandhan) 30 ऑगस्टला आहे. त्यामुळेच बाजारामध्ये चिक्कार राख्यांचे स्टॉल लागलेले पण तुम्ही पाहिले असतीलच. प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आतुर आहे. पण यंदा मात्र या बहिण भावाच्या सणाला थोडीशी अडचण आलीय. ती भद्रा मुहुर्ताची अन् त्यामुळं नेमकं रक्षाबंधन साजरा कधी करायचा? हाच प्रश्न बहिण-भावांना पडल्याचं पाहायला मिळतंय.

कावड यात्रेत खुलेआमपणे तलवार फिरवणं आमदार बांगरांना महागात पडलं, गुन्हा दाखल

आपल्या घरातील कॅलेंडरनुसार 30 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, अन् त्या दिवशी दिवसभर भद्रा काळ आहे. आणि या कालावधीमध्ये कोणतंही शुभ कार्य टाळलं जातं. या काळामध्ये शुभ कार्य केल्यास त्याचा काहीच फायदा होत नाही, अशी मान्यता आहे. त्यामुळं मग आता या दिवशी राखी कशीकाय बांधणार? असाच प्रश्न बहिण-भावांना पडला आहे. त्याचा विचार करुन ज्योतिषांनी रक्षाबंधनसाठी मुहूर्त सांगितले आहेत.

ज्योतिषांच्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या (Raksha Bandhan) दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला दिवसभर तर आपल्या भाऊरायाला राखी बांधता येणार नाही. मात्र जर कोणाला रक्षाबंधनच्या दिवशीच राखी बांधायची असेल तर त्यांनी 30 ऑगस्टच्या रात्री 8 वाजून 57 मिनिटांनंतर थोडक्यात रात्री 9 नंतर राखी बांधता येणार आहे.

दुसरं म्हणजे 31 तारखेला राखी बांधायची असेल तर सकाळी 7.45 वाजेपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे रक्षाबंधन (Raksha Bandhan) रात्री साजरे करण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सकाळी अर्थात 31 ऑगस्टला सकाळी 7.45 मिनिटांपर्यंत साजरा करणे अधिक शुभ असल्याचे मानले जात आहे.

जाणून घ्या मुहूर्त :
पौर्णिमा सुरु : 30 ऑगस्ट 2023 सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी.
पौर्णिमा समाप्ती : 31 ऑगस्ट 2023 सकाळी 7.05

भद्राकाळ किती दिवस?
यंदा भद्राकाळ 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 ते रात्री 9.01 वाजेपर्यंत असेल. या काळात राखी बांधणे अशुभ मानलं जातं.

Tags

follow us