कावड यात्रेत खुलेआमपणे तलवार फिरवणं आमदार बांगरांना महागात पडलं, गुन्हा दाखल

कावड यात्रेत खुलेआमपणे तलवार फिरवणं आमदार बांगरांना महागात पडलं, गुन्हा दाखल

MLA Santosh Bangar : सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. नाग समजून दूध पाजलं, मात्र आता उलटून डसायला लागला, असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, ठाकरेंच्या सभेला सभेला उत्तर देण्यासाठी बांगर यांनी कावड यात्रा काढत खुलेआमपणे नंगी तलवार (sword) नाचवल्यानं पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरेंनी केलेली टीका आमदार संतोष बांगर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्यांनी काल कावड यात्रा काढून शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या दौऱ्यात कावड यात्रेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कळमनुरी शहरात कावड यात्रा काढत त्यांनी महादेवाला अभिषेक केला. यासोबतच त्यांनी भगवे वस्त्र नेसत गळ्यात आणि दंडावर रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालून स्वागत केले. या कावड यात्रेत शिवभक्तांनी आमदार बांगड यांचा सत्कार करून त्यांना तलवार दिली. यावेळी बांगर यांनी उपस्थित जनसमुदायासमोर एक कृती केली, त्यातुळं ते अडचणीत आले.

Zareen Khan: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अभिनेत्रींचे खेळाबद्दल प्रेम पाहिलंत का? 

अतिउत्साहाच्या भरात संतोष बांगर यांनी शिवभक्तांनी दिलेली ही तलवार म्यानातून बाहेर काढून खुलेआमपणे जमलेल्या समुदायाला दाखवत शक्तीप्रदर्शन केलं. हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्यानं आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

एवढेच नाही तर आमदार बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते डीजेच्या तालावर ठेका धरतांना दिसले. याप्रकरणी डीजेच्या मालकावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या कृतीमुळं त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते आहे.

उद्धव ठाकरेंची टीका-
संतोष बांगर यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले होते की, मटक्याचा धंदा करणारा हिंदुत्ववादी कसा असू शकतो, गद्दार अनेक झाले, पण हिंगोली नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. ते बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आहे. मागे नागपंचमी झाली, या गद्दारीची नाग समजून आपण पूजा केली. पण तो उलटा फिरून डसायला लागला, अशा शब्दांत बांगर यांच्यावर टीका केली.

बेंडकुळ्या आहेत, तेच दाखवतील, अशा शब्दात बांगर यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचेच आहेत त्यामुळं आमचा बाप चोरला असं कुणी म्हणू नये, असंही बांगर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube