Download App

Realme 15 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च, 7000 एमएएच बॅटरी, AI फीचर्स अन् किंमत फक्त…

Realme 15 Pro 5G Launched : भारतीय बाजारात आज Realme ने मोठा धमाका करत भन्नाट फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह Realme 15 सिरीज लॉन्च केली आहे.

  • Written By: Last Updated:

Realme 15 Pro 5G Launched : भारतीय बाजारात आज Realme ने मोठा धमाका करत भन्नाट फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह Realme 15 सिरीज लॉन्च केली आहे. Realme 15 सिरीज अंतर्गत कंपनीने Realme 15 आणि Realme 15 Pro फोन लॉन्च केले आहे. कंपनीचे दोन्ही फोन 5G असून यामध्ये एकापेक्षा एक AI फीचर्स देण्यात आले आहे. दोन्ही फोनमध्ये 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि यासाठी 80W फास्ट चार्जर देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बेस मॉडेल MediaTek Dimensity 7300+ चिपसेटसह येतो, तर Pro व्हेरियंट स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 चिपसेटसह सुसज्ज आहे. दोन्ही फोन 50-मेगापिक्सेल सेल्फी शूटर, 50-मेगापिक्सेल प्रायमरी रिअर कॅमेरा आणि AI इमेजिंग टूल्सने सुसज्ज आहेत. Pro व्हेरियंटचे फ्रंट आणि रियर कॅमेरे 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते.

Realme 15 सिरीजची किंमत
भारतीय बाजारात कंपनीने Realme 15 Pro चार व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. 8GB RAM + 128GB व्हेरियंटची किंमत 31,999 रुपये आहे तर 8GB RAM + 256GB व्हेरियंटची किंमत 33,999 रुपये असून 12GB RAM + 256GB व्हेरियंटसाठी 35,999 रुपये आणि 12GB RAM + 512GB व्हेरियंटची किंमत भारतीय बाजारात 38,999 रुपये असणार आहे.

तर दुसरीकडे कंपनीने Realme 15 तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. 8GB RAM + 128GB व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये आहे तर 8GB RAM + 256GB व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB व्हेरियंटची किंमत 30,999 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दोन्ही फोन 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Realme 15 सिरीज फीचर्स
Realme 15 Pro आणि Realme 15 फोन 6.8 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतात. फोन डिस्प्ले 6,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय, त्यामध्ये 2500Hz चा टच सॅम्पलिंग रेट उपलब्ध असेल. त्याच्या सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i उपलब्ध आहे.

या सिरीजच्या बेस मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300+ 5जी प्रोसेसर आहे. तर प्रो मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Genie 4 सह येतो. हे दोन्ही फोन 12 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 4.1 स्टोरेजला सपोर्ट करतात. ते अँड्रॉइड 15 वर आधारित Realme UI 6 वर काम करतात.

Realme च्या या दोन्ही फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात AI Edit Genie आणि AI Genie यांचा समावेश आहे. हे दोन्ही फोन 7000 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध असतील. हे IP66, IP68 आणि IP69 रेटेड आहेत, ज्यामुळे फोन पाण्यात बुडले तरी खराब होणार नाहीत.

अहमदाबाद विमान अपघात अन् 4 दिवसांनी आजारी पडले 112 पायलट, संसदेत धक्कादायक खुलासा 

Realme 15 pro च्या रिअरला 50 एमपी मेन ओआयएस तसेच 50 एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर बेस मॉडेलमध्ये 50 एमपी मेन ओआयएस कॅमेरासह 8 एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या दोन्ही फोनमध्ये 50 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल.

follow us

संबंधित बातम्या