Download App

कृषी विभागात बंपर ओपनिंग्ज, पगार 1, 12400 रुपये, दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

  • Written By: Last Updated:

Agriculture Department recruitment : राज्य सरकारच्या कृषी विभागाने लघुलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षकांच्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. ही पदे सरळसेवेने भरण्याकरता या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासांटी पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितललेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवार http://www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.  या भरतीअंतर्गत एकूण 218 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Recruitment for Stenographer Senior Clerk and Assistant Superintendent Posts by Agriculture Department)

एकूण रिक्त पदे – 218

पदाचे नाव –
लघुलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.

शैक्षणिक पात्रता –
1. लघुलेखक – 10वी पास / शॉर्ट हँड 80 wpm आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm किंवा मराठी टायपिंग 30 wpm.
2. लघुलेखक (उच्च श्रेणी) – 10वी पास/शॉर्ट हँड 120 wpm आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm किंवा मराठी टायपिंग 30 wpm.
3. स्टेनोग्राफर – 10वी पास / शॉर्ट हँड 100 w.p.m. आणि इंग्रजी टायपिंग 40 w.p.m. किंवा मराठी टायपिंग 30 WPM
4. वरिष्ठ लिपिक – किमान द्वितीय श्रेणी पदवी
5. सहाय्यक अधीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी. विधी शाखेची पदवी असल्यास प्राधान्य

Duleep Trophy 2023; हनुमा विहारीच्या संघाने पटकावले दुलीप करंडकचे विजेतेपद
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – किमान वय 18 ते कमाल 40 वर्षे.
मागासवर्गीयांसाठी – 18 ते 45 वर्षे.

भरती प्रक्रिया –
जाहिरातीमध्ये नमूद केलेली अर्हता आणि पात्रतेविषयक अटी किमान असून अहर्ता धारण केलेली उमेवादार पात्र ठरू शकतात.  या पदासांठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

अर्ज फी –
खुला वर्ग – रु.750.
परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.

पगार –
35000- 112400 (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते)

अधिकृत वेबसाईट – http://krishi.maharashtra.gov.in/

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023

भरतीबद्दल अधिक आणि तपशीलवार माहिती घेण्यासाठी कृपया अधिकृत वेबसाइट http://krishi.maharashtra.gov.in/ वर भरती जाहिरात पहा.

Tags

follow us