Duleep Trophy 2023; हनुमा विहारीच्या संघाने पटकावले दुलीप करंडकचे विजेतेपद

Duleep Trophy 2023; हनुमा विहारीच्या संघाने पटकावले दुलीप करंडकचे विजेतेपद

Duleep Trophy 2023; दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. यासह संघाने विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला. हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाचा खेळाडू विद्वत कवेरप्पा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. दक्षिण विभागाच्या संघात मयंक अग्रवाल आणि तिलक वर्मा यांचाही समावेश होता.

दक्षिण विभागाने पहिल्या डावात 213 तर दुसऱ्या डावात 230 धावा केल्या. यादरम्यान हनुमा विहारीने पहिल्या डावात 130 चेंडूंचा सामना करत 63 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. मयंकने पहिल्या डावात 28 धावा केल्या. दुसऱ्या डावात हनुमाने 42 धावा केल्या. मयंकने 35 धावांचे योगदान दिले. टिळक वर्मा विशेष काही करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात 37 धावा केल्या. त्याने 75 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार मारले.

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, आता हिटमॅन पहिल्या क्रमांकावर…

पश्चिम विभागाचा संघ पहिल्या डावात 146 धावांवर आटोपला. तर दुसऱ्या डावात 222 धावा केल्या. अशाप्रकारे त्यांना अंतिम फेरीत 75 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वी शॉने संघासाठी पहिल्या डावात 65 धावांचे योगदान दिले. त्याने 101 चेंडूंचा सामना करत 9 चौकार मारले. कर्णधार प्रियांक पांचाळने दुसऱ्या डावात 95 धावांची शानदार खेळी केली.

तरीही संघाला विजय मिळविता आला नाही. त्याने 211 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार मारले. दक्षिण विभागाच्या कावरप्पाने शानदार गोलंदाजी केली. त्याने 19 षटकात 53 धावा देत 7 बळी घेतले. कावरप्पाने 5 मेडन षटकेही काढली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube