Download App

आयुर्वेद विज्ञान संशोधन केंद्रात Senior Research Fellow पदांची भरती, महिन्याला 35,000 पगार, थेट मुलाखत

  • Written By: Last Updated:

Center for Research in Ayurveda Science Recruitment : सेंटर फॉर रिसर्च इन आयुर्वेद सायन्स (CCRAS) अंतर्गत ‘वरिष्ठ रिसर्च फेलो’ (Senior Research Fellow) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघाली आहे. या भरती अंतर्गत, एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणात. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरतीचे ठिकाण, पगार आणि मुलाखतीची तारीख याची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली. (Recruitment for the post of Senior Research Fellow under CCRAS last interview date 27 july)

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो

एकूण पदांची संख्या – 5

शैक्षणिक पात्रता-

-BAMS पदवी

– ज्यांच्याकडे उच्च पात्रता आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. (उदा. एमडी – आयुर्वेद)
-वैज्ञानिक दस्तऐवज/ लेख / तांत्रिक अहवाल मुसदा तयार करणं यात कौशल्य
– संगणकांचे ज्ञान(एस वर्लड, एमस एक्सेल, पॉवर पॉईंट)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 35 वर्षे.

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.

आळंदीमधील शाळा होणार बंद? ‘या’ आजाराचा वाढला प्रादुर्भाव; आतापर्यंत 1560 प्रकरणे समोर 

मुलाखतीचा पत्ता –
RRAP, CARI, पोदार मेडिकल कॅम्पस, डॉ. किंवा अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400018.

मुलाखतीची तारीख – 27 जुलै 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.ccras.nic.in

पगार –
सिनियर रिसर्च फेलो या पदासाठी दरमहा ३५ हजारांपर्यंत वेतन असेल.

भरती प्रक्रिया –
वरिष्ठ संशोधन फेलो पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
तसेच शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादी नमूद करणे आवश्यक आहे.

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1n7GFHDNLZSXMGEFKCk0qRiL_FuqfwOjP/view

Tags

follow us