Big B साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? काय असणार सिनेमाची कहाणी 

Big B साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? काय असणार सिनेमाची कहाणी 

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर आधारित २०१९ साली हिंदी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. मोदींच्या बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमामध्ये  दाखवण्यात आला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका या सिनेमात साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


परंतु आता मोदींवर आणखी एक सिनेमा येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच निर्माती प्रेरणा अरोराने मोदींवर सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या सिनेमात मोदींच्या भूमिकेसाठी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका बिग बी (Big B) ही पहिली निवड असल्याचे प्रेरणा अरोराने यावेळी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारतात सर्वात डायनॅमिक, सक्षम व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. यामुळे मी पंतप्रधान मोदींवरती सिनेमा करू इच्छिते. या सिनेमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेकरिता अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी हे योग्य असल्याचे वाटत आहे. कारण त्यांच्यापेक्षा जास्त कोणी देखील या भूमिकेच्या बरोबरीला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

सिनेमाच्या कहाणीच्या विषयी बोलत असताना प्रेरणा म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंवर आधारित हा सिनेमा असणार आहे.खरं तर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या अनेक घटना घडल्या असणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे अनेक परकीय धोरणे आणण्यापासून ते कोरोना महामारी हाताळण्यापर्यंत आणि लसीकरण असे सर्व काही या सिनेमात दाखवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान प्रेरणा अरोराने याअगोदर ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘परी’ यांसारख्या सिनेमाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा कधी येणार हे आता येत्या काळात लावलेच समजणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube