Download App

अमरावती महानगरपालिकेत परीक्षा न देताच मिळणार नोकरी, महिन्याला 75 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

Amravati Municipal Corporation Recruitment : आजच्या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं हे महाकठीण काम आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, अमरावती महानगरपालिकेने (Amravati Municipal Corporation) आता विविध पदांची भरती जाहिर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM या पदांसाठी आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 22 जून 2023 असेल. (Recruitment of 56 posts in Amravati Municipal Corporation, Salary Rs.75 thousand)

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जासोबत सादर केलेल्या छायांकित प्रत व मुळ दस्ताऐवज यांचेमध्ये तफावत आढळल्यास अथवा खोटी माहिती आढळल्यास उमेदवारांची निवड रद्द होईल, याची नोंद घ्यावी. महत्वाचं म्हणजे, एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमदेवारांनी प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा.

एकूण पदे – 56

पदांचा तपशील –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
3. सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ
4. एपिडेमियोलॉजिस्ट
5. स्टाफ नर्स
6. फार्मासिस्ट
7. एएनएम

Kangana Ranaut: पंगा क्विन कंगना लग्नाच्या बेडीत अडकणार? म्हणाली, ‘लग्न करण्याची इच्छा आहे, पण…’ 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : शिक्षण एमबीबीएसपर्यंत असावे.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : शिक्षण एमबीबीएसपर्यंत असावे.
मायक्रोबायोलॉजिस्ट : एमडी मायक्रोबायोलॉजी पर्यंत शिक्षण असावे.
एपिडेमियोलॉजिस्ट: आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पर्यंतचे शिक्षण आवश्यक
स्टाफ नर्स: वैध नोंदणीसह शिक्षण MNC ते GNM पर्यंत असावे.
फार्मासिस्ट: बारावी पर्यंत शिक्षण + D.Pharma.
एएनएम: एएनएम अभ्यासक्रमासह शिक्षण 10वी उत्तीर्ण असावे.

आवश्यक कागदपत्रे –
– बायोडेटा
-10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र

– शाळा सोडल्याचा दाखला
– जात प्रमाणपत्र (ओबीसी उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)

– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
– अधिवास व राष्ट्रीय प्रमाणपत्र
– महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी (वैद्यकीय अधिकारी पदासाठी)
– महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी (स्टाफ नर्स)
– जन्माचा दाकला
– एमएससीआयटी प्रमाणपत्र
– लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
– नावाद बदल असल्यास गॅजेट

वयोमर्यादा –
वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे
अराखिव प्रवर्गासाठी 38 वर्ष
राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष
एनएचएम अंतर्गत काम केलेल्या उमेदवारांना 5 वर्ष वयोमर्यादा शिथील राहिल.

नोकरीचे ठिकाण – अमरावती

पगार-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/- प्रति महिना
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. 30,000/- दरमहा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – रु. 75,000/- दरमहा
एपिडेमियोलॉजिस्ट – रु. 35,000/- दरमहा
स्टाफ नर्स – 20,000/- प्रति महिना
फार्मासिस्ट – रु. 17,000/- प्रति महिना
ANM – रु. 18,000/- प्रति महिना

अर्ज करायची पध्दत – ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता-

अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (एंट्री-एक्झिट हॉल, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँक वर, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात – https://amravaticorporation.in/wp-content/uploads/2023/06/NUHM-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-2.pdf

 

 

Tags

follow us