Kangana Ranaut: पंगा क्विन कंगना लग्नाच्या बेडीत अडकणार? म्हणाली, ‘लग्न करण्याची इच्छा आहे, पण…’
Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगनानं या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या कंगना ही सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान कंगनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे.
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाली कंगना?
कंगनाला एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विचारण्यात आले आहे. यावेळी कंगना म्हणाली की, “प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ माझ्या आयुष्यात येणार असेल तर ती येणार आहे. माझे लग्न व्हावे, माझे स्वतःचे कुटुंब असावे, अशी माझी इच्छा आहे. परंतु ते योग्य वेळमध्ये करणार आहे. कंगनाच्या या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
कंगनाचं नाव अनेकांबरोबर जोडले गेले होते. गेल्या काही वर्षांपूर्वी कंगना ही अभिनेता हृतिका रोशनला डेट करत असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु आता कंगना ही कोणासोबत लग्न करणार? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा ‘टिकू वेड्स शेरू’ या अभिनेत्री कंगना रनौतच्या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) देखील या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2, इमर्जन्सी आणि तेजस या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या आगामी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता कंगनाचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हे साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे. हा सिनेमा 23 जून रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, जो मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्ट्रगल करत आहे.