Download App

खुशखबर! महावितरणमध्ये 53 पदांसाठी भरती सुरू, ‘या’तारखेपर्यंत अर्ज करू शकता

  • Written By: Last Updated:

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ही भारतातील सर्वात मोठ वीज वितरणं कंपनी आहे. या कंपनीत नोकरी करू इच्छिणाऱ्यांना एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. महावितरण कंपनी या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

14 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज करायला सुरूवात झाली आहे. या पदासाठी, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार भरती आणि वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. त्याची सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

एकूण रिक्त पदे- 53
पदांचा तपशील
विजतंत्री- 43
तारतंत्री- 10
कोपा- 06

शैक्षणिक पात्रता –
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10 +2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक
2. संबंधित विषयात ITI.

आवश्यक कागदपत्रे-
एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका व सनद प्रमाण पत्राची साक्षांकीत प्रत
आयटीआय उत्तीर्ण गुण पत्रिका, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
जातीचा दाखला
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे.

Vikhe VS Thorat : मुख्यमंत्रीपदासाठी विखेंनी थोरातांच्या मतरदारसंघात दर्ग्यावर चढवली चादर 

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय – 5वर्षांची सूट.

अर्ज फी – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – भंडारा.

अधिकृत वेबसाइट – https://www.mahadiscom.in/

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

महत्वाच्या अटी-
प्रशिक्षण कालावधी १ वर्ष राहिल.
विद्यावेतन नियमाप्रमाणे राहिल

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1ROCFsAev8-7WHylHuuzjbV9d4wk_UuFV/view

Tags

follow us