Vikhe VS Thorat : मुख्यमंत्रीपदासाठी विखेंनी थोरातांच्या मतदारसंघात दर्ग्यावर चढवली चादर
Vikhe VS Thorat : सध्या राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकत आहे. उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यासाठी असलेली इच्छा अशा प्रकारे जाहीर होत असते. यातच नगर जिल्ह्यात एक अनोखीच घटना पाहायला मिळाली. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी चक्क दर्ग्यात प्रार्थना करण्यात आली. विशेष म्हणजे विखेंचे राजकीय कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांच्या मतरदारसंघातील एका दर्ग्यात ही प्रार्थना करण्यात आली आहे. या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
WhatsAap चॅटींग करताना जहिरात पाहा नाही तर पैसे भरा; कंपनीने सांगितला प्लॅन
संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्गा ट्रस्टच्या उर्स कमिटीच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमास विखे पाटलांना दरवर्षी निमंत्रण असते यंदाच्या वर्षी देखील ते उपस्थित होते. विखे पाटील यांच्या उपस्थितीत दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली त्यानंतर त्याठिकाणी प्रार्थना झाली. यावेळी जहागिरदार परिवार आणि उपस्थित भाविकांनी येत्या निवडणुकीत म्हणजेच 2024 मध्ये राधाकृष्ण विखे हे राज्याचे मुख्यमंत्रीपदी विरजमान व्हावेत, अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. तशी कार्यकर्त्यांनी प्रार्थना देखील केली. विखे यांनीही यावेळी दर्ग्याचे मनोभावे दर्शन घेतले.
कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत
यावेळी विखेंनी शेरो शायरीद्वारे राजकीय फटकेबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी एक शाहरी म्हटली आहे. ते म्हणाले,
सुना है दुष्मनों की गलीयोंमे आजकल मातम है
लो हम आ गये, विकास का सुरज रोषन करने.
पिछली बार मै जब यहाँ आया तो मैने दोस्ती की अपिल की थी.
लेकीन किसी ने एक दिन पूछ लिया…
जब आपका दोस्त संगमनेर में है…
तो तुम्हारा यहाँ क्या काम हैं?…
मैने भी मुस्कुराते हुए जवाब दिया… जहाँ मेरा दोस्त नाकाम हैं,
वही तो मेरा सबसे ज्यादा काम हैं…
वही तो मै कर रहा हॅू…
आपके जो काम वो ना कर सका,
उसे मुझेही तो करना है…
क्योंकी,
हम यारों के है यार, हम यारों के है यार,
वफादारों के लिए है दिलदार
हमसे मुकाबला न कर, हमसे मुकाबला न कर वरना घुमते रहोगे दर बदर
त्यामुळे आता थोरातांच्या मतदारसंघात विखेंची खेळी यशस्वी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातच भावी मुख्यमंत्री म्हणून विखेंसाठी केलेली प्रार्थना चर्चेचा विषय ठरतेय. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वी नगरमध्ये तसे बॅनरही लागले होते.