कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत

कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत

Mumbai News : मुंबईतील (Mumbai) आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या राजस्थानातील कंबलवाल्या बाबावर तत्काळ कारवाई करावी. त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. राम कदम यांनीच कंबल बाबांना मुंबईत पाचारण केल्याने या प्रकरणात आता ते अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे.

याबाबत अंनिसने म्हटले आहे, की कंबलवाले बाबा नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील भोंदूबाबा आ. कदम यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे व्हिडीओ राम कदम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या उपचारांवेळी आ. कदम तसेत काही पोलीस अधिकारीही तेथे उपस्थित असलेले दिसतात.  हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले असून जोरदार चर्चाही सुरू आहे.

Aurangabad : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी CM शिंदेंची ‘सुभेदारी’ 32 हजारांचा सुट अन् 300 गाड्या

मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रा जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार, स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करण, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर एक हजारपेक्षा जास्त भोंदू बाबांवर देखील पोलिसांन या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे आता वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबार देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल कराव व पीडित व्यक्तींची क्रूर थट्टा थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलींद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव आदींनी केली आहे.

समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर (Mukta Dabholkar) म्हणाल्या, सोशल मीडियावर एक व्हिडीओ अनेक जणांनी पाठवला. या व्हिडिओत राजस्थानातील कंबलवाले बाबा आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात विकलांग लोकांवर उपचार करताना दिसत आहे. ते लोक बरे झाल्यासारखे दाखवले जात आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे. त्यामध्ये स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे आणि चमत्कार करण्याचा दावा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने आम्ही पोलिसांना आवाहन करतो की या कंबलवाले बाबाला तत्काळ अटक करावी. त्याच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी त्वरित राजस्थानमधून आलेल्या या कंबलवाले बाबाची बुवाबाजी बंद करावी, अशी मागणी दाभोलकर यांनी केली.

CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार? राऊत म्हणाले, जर पोलिसांनी…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube