Renault Triber Facelift : भारतीय बाजारात आज रेनॉल्टने मोठा धमाका करत आपली नवीन 7 सीटर कार लॉन्च केली आहे. कंपनीने रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्ट (Renault Triber Facelift) या नावाने आपली नवीन 7 सीटर कार लॉन्च केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनीने कारच्या फ्रंट आणि रियरमध्ये बरेच बदल केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात 6.29 लाखांच्या एक्स शोरुम किंमतीमध्ये लॉन्च केले आहे.
नवीन स्टायलिंग
कंपनीने या कारच्या फ्रंट प्रोफाईलमध्ये बरेच बदल केले आहे. यात ब्लॅक रंगाच्या स्लॅटसह नवीन ग्रिल आणि मध्यभागी नवीन रेनॉल्ट लोगो आहे, ज्यामुळे ही कार नवीन डायमंड लोगो असलेली भारतातील पहिली कार बनली आहे. बंपरमध्ये मोठ्या एअर इनटेकसह बदल करण्यात आला आहे, तर हेडलॅम्प क्लस्टरमध्ये नवीन एलईडी डीआरएल बदलण्यात आले आहेत. बॅक प्रोफाइलमध्ये मध्यभागी एक नवीन ब्लॅक ॲप्लिक आहे, तर टेल लाईट्समध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. बंपरमध्ये नवीन सिल्व्हर ॲक्सेंट तसेच इतर बदल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे या कारच्या केबिनमध्ये नवीन डिजिटल कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसारखे बदल करण्यात आले आहेत. यासह कंपनीने या कारमध्ये थ्री रॉ कॉन्फिगरेशन कायम ठेवले आहे.
इंजिन
रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टमध्ये 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 71 बीएचपी आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) सह येते.
विधानभवनात राड्यानंतर स्थापन होणार एथिक्स कमेटी; सभापती राम शिंदेंची मोठी घोषणा
भारतीय बाजारात रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्ट मारुती सुझुकी एर्टिगाशी स्पर्धा करणार आहे. मारुती सुझुकी एर्टिगाची सुरुवातीची किंमत 7.97 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 13.26 लाख रुपयांपर्यंत जाते.