Download App

RRC Apprentice Recruitment 2023 : दहावी पास उमदेवारांसाठी नोकरीची संधी, भारतीय रेल्वेत 2409 पदांची भरती सुरू

  • Written By: Last Updated:

Railway Recruitment Cell Apprentice Recruitment : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती (Railway recruitment)प्रक्रिया राबवते. भारतीय रेल्वेत नोकरी मिळावी याासठी लाखो तरुण प्रयत्न करत असतात किंवा संधीची वाट पाहत असतात. दरम्यान, आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये २ हजार अधिक पदांसाठी भरती सुरू झाली.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने ही भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवार (अप्रेंटीस) पदासाठी भरती केली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत साइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी 28 सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या 2409 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अभियानांतर्गत मुंबई क्लस्टरमध्ये 1649 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, सोलापूर क्लस्टरमध्ये 76 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 पदे आणि नागपूर क्लस्टरमध्ये 114 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता-
अप्रेंटीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये ‘आयटीआय’ प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.

IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब 

वय श्रेणी-
अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेदरम्यान अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

कशी होणार निवड –
या पदांसाठी उमेदवार निवडण्यासाठी गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल (किमान 50% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे.

स्टायपेंड-
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७ हजार रुपये मानधन दिले जाईल.

अर्ज फी
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या भरतीसाठी अर्ज शुल्क रु. 100 आहे. तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात.

अधिकृत अधिसूचना –
https://rrccr.com/rrwc/Files/807f6770-0ee4-4e26-9716-ccae837bea92.pdf

Tags

follow us