IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब

  • Written By: Published:
IND VS NEP : नेपाळचा ‘कबीर खान’ ज्याने बदलले क्रिकेट संघाचे नशीब

Asia Cup 2023 :  आशिया चषकाला (Asia Cup) सुरूवात झाली असून, भारत पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (दि.4) भारत विरूद्ध नेपाळचा (India Vs Nepal Match) सामना रंगणार आहे. मात्र, सध्या चर्चा होतीये ती नेपाळ संघाच्या प्रशिक्षक असलेल्या मॉन्टी देसाई यांची. ज्या पद्धतीने त्यांनी नेपाळ संघाला तयार केले आहे. ते बघता त्यांना शाहरूखानच्या चक दे इंडियातील कबीर खान असे संबोधले जात आहे. काही वर्षांपूर्वी शाहरूख खानचा ‘चक दे इंडिया’ चित्रपट आला होता. यात शाहरूखने भारतीय हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षण म्हणून कबीर खान हे पात्र साकारले होते. त्यात भारतीय संघाची परिस्थिती जशी होती तशीच काहीशी परिस्थिती नेपाळ क्रिकेट संघाची होती. त्यानंतर मॉन्टी देसाई संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आले आणि त्यांनी कबीर खानची भूमिका निभावत संघाला एका वेगळ्या उंची नेऊन ठेवले. (Monty Desai Nepal Cricket Team Coach)

IND Vs NEP: पावसामुळे भारत-नेपाळ सामना रद्द झाला तर काय होईल?

आज आशिया चषकात खेळणाऱ्या नेपाळ संघदेखील कोसळण्याच्या उंबरठ्यावर होता. एवढेच नव्हे तर, त्यांचा एकदिवशीय सामन्यांचा दर्जादेखील हिरावू घेतला जाणार होता. त्याचवेळी चक दे मध्ये ज्या पद्धतीने शाहरूख खान कबीर खानच्या भूमिकेत येतो तशाच काहीशा पद्धतीने मॉन्टी देसाई नेपाळ संघाचे कबीर खान म्हणून समोर आले.

मॉन्टी देसाईंनी कसा केला नेपाळ क्रिकेटमध्ये बदल?

मॉन्टी देसाई हे प्रोफेश्नल कोच राहिलेले आहेत. नेपाळ संघाचे मुख्य प्रशिक्षण होण्यापूर्वी देसाई रणजी ट्रॉफीदरम्यान आंध्र प्रदेश संघाचे कोच होते. याशिवाय ते अफगाणिस्तान, यूएई, वेस्ट इंडिज आणि कॅनडा संघाचे फलंदाज प्रशिक्षक तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिले असून, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघातही त्यांची भूमिका होती.

चक दे इंडिया! पाकिस्तानला लोळवत आशिया चषकावर कोरलं नाव

कोच होण्यापूर्वीच केली पारखण्यास सुरूवात
देसाई यांचा अनुभव लक्षात घेता कोणता देश किंवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करणार नाही. तेच नेपाळने केलं. नेपाळ संघाने मॉन्टी देसाईंना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले. देसाईंनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी पदभार स्वीकारला, परंतु त्याआधीच म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीच देसाईंनी नेपाळ क्रिकेट संघ पारखण्यास सुरूवात केली होती.

30 दिवसांत 12 सामने 11 मध्ये विजय
देसाई यांची मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर नेपाळ संघाने 14 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत 12 एकदिवसीय सामने खेळले, त्यापैकी 11 जिंकले. नेपाळसाठी ही कामगिरी निश्चितच अपेक्षेपेक्षा जास्त होती.

BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

नेपाळने वाचवला वनडेचा दर्जा
मागच्या वर्षी नेपळ संघाच्या खराब कामगिरीमुळे डिसेंबरपर्यंत संघ इनकंसिस्टेंसी आणि डळमळीत फलंदाजी सारख्या समस्यांना तोंड देत होती. यामुळे 24 सामन्यांमध्ये 18 पॉइंट संघाला मिळाले होते. मात्र, महिनाभरात मिळवलेल्या 11 सामन्यांमधील विजयामुळे 22 पॉइंट्स मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे एकदिवसीय सामन्यांचा जाणार दर्जा वाचवण्यास संघाला मदत झाली.

देसाईंनी नेपाळ संघाला कोणता मंत्र दिला?
खराब कामगिरीमुळे एकदिवसीय सामन्यांचा दर्जा रद्द होण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या नेपाळ संघाला देसाईंनी कोणता कानमंत्र दिला असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला. यावर बोलताना माजी प्रशिक्षक जगत तमटा यांनी सांगितले की, देसाई यांनी प्रशिक्षक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सर्वात पहिले खेळाडूंना मानसिकृष्ट्या खंबीर करण्याचे काम केले. यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला.एवढेच नव्हे तर देसाईंनी ड्रेसिंग रूमचे वातावरण आनंददायी बनवले त्यामुळेच आज नेपाळ संघ कौतुकास पात्र ठरत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube