BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

BCCI Media Rights :  BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

BCCI Media Rights : बीसीआयने आयोजित केलेल्या मीडिया अधिकारांच्या लिलावात वायाकॉम 18 कंपनीने बाजी मारली आहे. रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम १८ ने पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मीडिया अधिकार सुरक्षित केले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी भारतातील क्रिकेट सामन्यांसाठी बीसीसीआय मीडिया अधिकारांसाठी सर्वाधिक बोली लावणारी वायकॉम 18 ठरली आहे.

जिओ सिनेमा (Jio Cinema) सर्व सामने ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम करेल आणि Sports18 ते टेलिव्हिजनवर प्रसारित करणार आहे. पूर्वीचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया मालिका आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ प्रसारित करणार आहे.

INDIA आघाडी अजेंडालेस, मोदींना मनातून काढू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

क्रिकबझमधील एका अहवालानुसार, Viacom18 पुढील पाच वर्षांसाठी भारताच्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यांचे प्रसारण करण्यासाठी एका सामन्यासाठी डिजिटल आणि टीव्ही दोन्हीसाठी ६७.८ कोटी रुपये देणार आहे.

दरम्यान, हे अधिकार दोन पॅकेजेसमध्ये विकण्यात आले असून पॅकेज ए मध्ये इंडिया सबकॉन्टिनेंट टीव्हीचा समावेश होता, तर पॅकेज बी मध्ये इंडिया सबकॉन्टिनेंट डिजिटल प्लस वर्ल्ड टीव्ही आणि डिजिटल समाविष्ट होते.

पॅकेज ए ची मूळ किंमत २० कोटी रुपये आणि पॅकेज बी साठी २५ कोटी रुपये ठेवण्यात आली होती, एकूण ८८ सामन्यांसाठी प्रत्येक गेमची एकत्रित आधारभूत किंमत ४५ कोटी रुपये इतकी होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube