Rule Change : सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त दोनच दिवस (Rule Change) शिल्लक राहिले आहेत. मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात देशात काही मोठे बदल (Rule Change From 1st October) पाहण्यास मिळतील. या बदलांचा परिणाम तुमच्या घरावरही होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या (LPG Cylinder Price) किंमती, क्रेडिट कार्ड, सुकन्या समृद्धी आणि पीपीएफ (PPF Rule Change) खात्याशी संबंधित नियमांत बदल यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊ या ऑक्टोबर महिन्यात काय बदल होणार आहेत.
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅसच्या (LPG Price) किंमतीत काही बदल करत असतात. त्यामुळे मंगळवारी (1 ऑक्टोबर) सकाळी सहा वाजता एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झालेला दिसू शकतो. मागील काही दिवसांपासून 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या दरात बदल होताना दिसत आहेत. घरगुती गॅसच्या दरात मात्र बदल झालेले नाहीत. सप्टेंबर महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. घरगुती गॅसचे दर आहे तेच राहिले होते. आता दिवाळीआधी घरगुती गॅसचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एअर टर्बाइन फ्यूल (विमानाचे इंधन) आणि सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल करत असतात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या इंधनाच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात एटीएफच्या किंमतीत कपात झाली होती.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; LPG सिलिंडर महागलं, काय आहे नवा दर?
जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही क्रेडिट कार्ड्सचा (HDFC Credit Cards) लॉयल्टी प्रोग्राम बदलला आहे. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. यानुसार एचडीएफसी बँकेने स्मार्टबाय प्लॅटफॉर्मवर अॅपल प्रॉडक्ट्ससाठी रिवार्ड पॉइंटच्या रिडम्पशनला एक प्रॉडक्ट प्रत्येक तिमाही असे धोरण निश्चित केले आहे.
केंद्र सरकारमार्फत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेशी संबंधित नियमात मोठा बदल झाला असून हा बदल येत्या मंगळवारपासून लागू होणार आहे. या बदलानुसार मुलींचे कायदेशीर पालकच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते संचालित करू शकतील. या योजनेत मुलीच्या कायदेशीर पालक नसलेल्या एखाद्या व्यक्तीने मुलीच्या नावे खाते उघडले असेल तर अशा परिस्थितीत ते खाते मुलीच्या नैसर्गिक पालकांना हस्तांतरीत केले जाईल. जर असे शक्य नसेल तर खाते बंद होऊ शकेल.
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेत तीन बदल होणार आहेत. हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. 21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत आर्थिक विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या नुसार तीन नवीन नियम लागू केले जाणार आहेत. याअंतर्ग एकापेक्षा जास्त खाते उघडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. याव्यतिरिक्त अनियमित खात्यांवर पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटचे व्याज तेव्हाच देण्यात येईल ज्यावेळी संबंधित व्यक्ती खाते उघडण्यास पात्र होईल.