Download App

Satish Kaushik Death : सतीश कौशिक यांचं निधन, असा करा हृदयविकारापासून बचाव

  • Written By: Last Updated:

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील त्यांच्या घरी नेलं जाणार आहे. त्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पण केवळ 66 वर्षांच्या वयात त्यांना हा हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची कारण काय त्यापासून कसा बचाव करायचा पाहू….

Satara : शंभूराजेंच्या घराशेजारी उदयनराजेंची बिल्डींग, दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागली फिल्डींग 

हृदयविकाराचा झटका कसा येतो ?

हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फ्रक्शन देखील म्हटलं जात. मांसपेशींना रक्त पुरवठा व्यवस्थित न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. रक्त पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी तात्काळ उपचारांची आवश्यकता असते. पण तात्काळ उपचार न मिळाल्यास मांसपेशींना इजा होते. परिस्थिती बिघडल्यास मृत्यू होतो. ही प्रक्रिया अत्यंत वेगवान असते. त्यामुळे तात्काळ उपचार मिळणे कठीण असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांना मृत्युचा धोका जास्त असतो.

तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या संकेतांना ओळखणे आणि काळजी घेणे गरजेचे असते.

हृदयविकाराच्या झटक्याच्या या लक्षणांना ओळखा :

1. हृदयविकाराच्या झटक्याच्या अधिक प्रकरणांमध्ये छातीत मध्यावर डाव्या बाजूला अस्वस्थ आणि वेदना जाणवते. ती काही वेळ किंवा जास्त वेळ होऊ शकते. याला अनेकदा गॅस समजून दुर्लक्ष केलं जात. तसेच खांदा, दंड दुखीकडेही दुर्लक्ष केलं जात. असे दुर्लक्ष करू नये.
2. कमजोरी किंवा भोवळ येणे, गार घाम येणे.
3. जबडा, मान, पाठ किंवा पोटाच्यावरील भागात वेदना होणे .
4. एक किंवा दोन्ही हातांना, खांद्यांना वेदना होणे .
5. श्वास घ्यायला त्रास होणे, यासोबतच छातीत दुखते.
6. खूप जास्त घाम येणे.

60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी हृदयविकाराचा झटका येण्यापासून कसा बचाव कारावा ?

Maharashtra Budget 2023 : त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्यांना उपाशी ठेवलं; अर्थसंकल्पाआडून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

1. स्मोकिंग, वेपिंग सोडा. सेकेंड हॅंड स्मोक टाळा.
2. ब्लड प्रेशर नेहमी 120/80 mm Hg च्या खाली ठेवा.
3. कोलेस्ट्रॉल लेव्हल नेहमी तपासत रहा.
4. सेचुरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, सोडियम आणि एक्स्ट्रा शुगर फूड आयटम्स टाळा.
5. फिजिकली एक्टिव रहें. हफ्ते में 150 मिनट की मध्यम-तीव्रता वाली फिजिकल एक्टिविटी करने का टारगेट सेट करें.
6. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. एक नॉर्मल बॉडी मास इंडेक्स 18.5–24.9 असायला हवा.
7. फास्टिंग ब्लड शुगर 100 mg/dL पेक्षा कमी ठेवा.
8. चांगली झोप घ्या. दिवसभरात 7 ते 9 तास झोप घ्या.
9. रेगुलरली मेडिकल चेकअप करा.
10. मेडिसिन्स योग्य वेळेवर घ्या.
11. आरोग्याबाबतीत हलगर्जीपमा करू नका.

Tags

follow us