Maharashtra Budget 2023 : त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्यांना उपाशी ठेवलं; अर्थसंकल्पाआडून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Budget 2023 : त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्यांना उपाशी ठेवलं; अर्थसंकल्पाआडून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Ekanth Shinde Reaction on Maharashtra Budget : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तयार केला गेला आहे,  अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजराचा हलवा असल्याचे म्हटले. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा : Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट तर फडणवीसांचे अर्थसंकल्पात घोषणा काय ?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरच त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शिंदे म्हणाले, की खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय. त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वतः खाल्लं, दुसऱ्याला मात्र उपाशी ठेवले. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. आम्ही जो अर्थसंकल्प मांडला आहे तो वस्तूनिष्ठ आहे. त्याचे दृश्य परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील. आकडे फुगविण्यासाठी आम्ही हे केलेले नाही. तसेच कोरडी आश्वासनेही दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहिलो आहोत.

Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस, किसान सभेची टीका

यानंतर वीजबिल माफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, की वीजबिल माफीचं काय, मागील अधिवेशनात घोषणा केली होती. पण अधिवेशनानंतर वीज कापली. मात्र, आमचे सरकार असे करणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की अर्थसंकल्पात त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. आम्ही सगळे काही करून दाखवले आहे. त्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. अधिवेशनातही त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube