Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट तर फडणवीसांचे अर्थसंकल्पात घोषणा काय ?
Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. ६ महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यावर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे.
यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी मोठा दिलासा देण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकारनं महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तर महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करण्याचीही घोषणा केली.
काल महिला दिन साजरा करण्यात आला, राज्याची तशीच राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते, त्याकरिता आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत ४ कोटी महिला आणि मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येणार आहे.
राज्यात अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे २० हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली. तसेच, बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बचत गटांच्या माध्यमात लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येणार असल्याची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली.
Maharashtra Budget 2023 : घोषणांचा पाऊस; पंचांमृताद्वारे फडणवीसांनी फुंकले 2024चं रणशिंग!
अर्थसंकल्पात महिलांसाठी या घोषणा :
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरामध्ये महिलांना ५० टक्के सवलत, चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार, महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला- मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार या घोषणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अवकाळी पाऊस, नापिकी आणि शेतमालाचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी राजा सध्या चिंतेत आहे. बजेटमध्ये बळीराजाकरिता अनेक मोठ्या घोषणा करण्यात आला. तसेच, महिलांसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.