Download App

अनुसूचित जातीच्या लाभार्थींना दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

LetsUpp l Govt. Schemes
राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास (Dairy production) चालना देण्यासाठी अनुसूचित जाती(Scheduled caste)/ आदिवासी/ आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी यांच्यासाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविली जाते.

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी…

योजनेसाठी अटी :
– 2 दुधाळ जनावरांचा गटासाठी आवश्यक निवारा, पुरेसा चारा, खाद्य व पाणी याची व्यवस्था स्वबळावर करावयाची आहे.
– गटातील गायी / म्हशी, पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा / योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळी उपलब्ध करून देणे.
– गायी / म्हशी 3 वर्षे योग्य रितीने सांभाळणे व व्यवसाय करणे बंधनकारक आहे.
– लाभधारकास योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
– लाभधारक पती / पत्नीपैकी कोणीही शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त नाही, अथवा पदाधिकारी नसावेत.
– गायी/म्हशी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी यांचे परवानगीशिवाय विकता येणार नाही.

लाभाचे स्वरूप :
– दुधाळ जनांवरे प्रकल्पाची एकूण किंमत – 85061/- रु.
– अनुसूचित जाती / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के अनुदान देय राहील.

आवश्यक कागदपत्रे :
– फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
– 7/12 व 8-अ उतारा व ग्रामपंचायत नमुना नं. 8
– प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
– जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
– बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
– रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
– अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)

संपर्क कार्यालयाचे नाव :
– पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
– जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद,
– जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

Tags

follow us