Download App

पॉर्न सर्च करतायं? तर सावध व्हा…कारण

तुम्ही इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ शोधण्यासाठी सर्च करत असाल तर सावधान. कारण काही दिवसांपासून पॉर्न वेबसाईट सर्च केल्याप्रकरणी सायबर गुन्हेगारांकडून अनेकांची फसवणूक होत असल्याचं दिसून आलंय. सावज अलगदपणे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कसा अडकतो? याबाबत सविस्तर पाहुयात…

महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी

भारतात पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही जणांकडून पॉर्न व्हिडिओ शोधण्यासाठी सर्च केलं जातंय. तुम्ही पॉर्न व्हिडिओसाठी एखादी वेबसाईट सर्च केल्यानंतर थेट सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडणार आहात. कारण अशा गोष्टी सर्च करणाऱ्यांवर सायबर गुन्हेगारांची कडक नजर असल्याचं समोर आलंय.

नाना पटोले म्हणाले, मविआच्या वाढत्या प्रभावानं विरोधक धास्तावले

समजा, एखाद्या सावजाने पॉर्न वेबसाईट सर्च केली असेल तर त्याच्या समोर भारत सरकारच्या नावाचं एक फेक पेज उघडतं. भारत सरकारच्या या फेक पेजचा युआरएल india.gov.in/police असा असतो. त्यासोबतच तुम्ही पॉर्न वेबसाईट सर्च केल्याप्रकरणी तुमच्यावर हजारो रुपयांचा दंड सरकारकडून आकारला जात असल्याचं पेजद्वारे सांगण्यात येतं.

आता कुठे जायचे कशाला ?, फोनमधूनच द्या अंगठा; फिंगरप्रिंटसाठी तयार होतेय ‘ही’ खास प्रणाली

तुमच्यावर आकारलेला दंड ऑनलाईनच्या माध्यमातून डेबिट, क्रेडीट कार्डद्वारे भरा अन्यथा कारवाई होणार असल्याचंही सांगितलं जातं. त्यानंतर सावज भीतीने आकारले दंड भरतो. दंड भरल्यानंतर सावजाला वाटतं की आता प्रश्न मिटला मा असं केल्याने सावजाची संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचून वारंवार त्याला त्रास देण्याच प्रयत्न केला जातो.

दरम्यान, अद्याप अशा गोष्टींबाबत सायबर क्राईममध्ये तक्रारी झाल्यात की नाहीत? याबाबत अस्पष्टता असून इंटरनेट विश्वात सायबर गुन्हेगारांच्या या शक्कलने पॉर्न वेबसाईट सर्च करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Tags

follow us