Viagra : लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारचे औषधे घेतल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे लैंगिक उत्तेजनासाठी सेवण करणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो. त्यामुळे मृत्यू ओढतोय का ? याबाबत अहमदनगरमधील मनोलैंगिक तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांच्याशी संवाद साधला.
लैंगिक समस्या का निर्माण होते ?
लैंगिक समस्या सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे मुख्य कारण व्यसन हेही आहे. तंबाखू, मावा, गुटखा यांच्या सेवनामुळेही लैंगिकतेवर परिणाम होतो. शेतीत पिकासाठी वापरण्यात येत असलेल्या हानिकारक औषधांच्या फवारणीमुळे लैंगिक समस्या निर्माण होते. शेतकरी वर्गामध्ये खूप जास्त लैंगिक समस्या वाढत आहेत. त्याचबरोबर मधुमेह, लठ्ठापण, स्वप्नदोष, धातूपात हेही कारणे आहेत. आर्थिक तणाव, ताण-तणाव याचा परिणाम लैंगिक समस्येवर होतो ?
गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल
गोळ्यांमुळे लैंगिक उत्तेजना कशी वाढते?
लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी बाजारात अनेक गोळ्या उपलब्ध आहेत. त्यात व्हायग्रा, सुहाग्रा यांच्यासह अनेक ब्रॅण्डच्या गोळ्या उपलब्ध आहेत. ज्यांना लैंगिक समस्या असतात, असे लोक या गोळ्या घेतात. या गोळ्या घेतल्यानंतर शरिरात रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे लिंगाचा ताठरता जास्त राहते. व्हायग्रासारखी गोळी ही घेतल्यानंतर बारा मिनिटांपासून त्याचा शरीरावर परिणाम होतो. तर काही वेळेस हा परिणाम चार तासही राहतो. त्यामुळे अनेकदा गोळ्यांची सवय होऊ जाते. गोळ्यांशिवाय लैंगिक गरज भागविली जाऊ शकत नाही.
‘इंडिया’च्या युतीला फाटा देत बसपाचा स्वबळावर लढण्याचा नारा; मायावतींची घोषणा
या गोळ्या कुणी घेऊ नये ?
तसा विचार केला तर या गोळ्या कुणी घेऊ नये. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्या घ्याव्यात. परंतु त्यात ज्यांना हद्यविकाराचा आजार, मधुमेह, रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी या गोळ्या सेवन करू नये, असा सल्लाही डॉक्टर मुथा यांनी दिला आहे.
या गोळ्यांचे व्यसन लागते का ?
या गोळ्या सहजासहजी बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे कुणालाही मेडिकलमध्ये या गोळ्या सहज मिळतात. त्यामुळे डॉक्टरकडे न जाता या गोळ्याचे प्रमाण वाढले आहे. दहामधील आठ जण परस्पर या गोळ्या खरेदी करून सेवन करतात. सुरुवातीला 25 मिलीग्रॅम गोळी घेण्यापासून सुरुवात करतात. अनेक जण तर शंभर, दोनशे मिलीग्रॅमची गोळ्या घेतात. एकदा गोळी घेतल्यानंतर त्याचे व्यसन जडते. या गोळ्या घेतल्याशिवाय लैंगिक संबंध निर्माण होत नाही.
शरीरावर कसा परिणाम होतो?
लैंगिक उत्सेजना वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या या शरीरावर थेट परिमाण करतात. या गोळ्या घेतल्यानंतर रक्ताचा लिंगाकडचा पुरवठा शंभरपटीने वाढतो. त्यामुळे लिंगाच्या नसा डॅमेज होतात. वारंवार गोळ्या घेतल्यानंतर शरीराला गरम होणे, चक्कर येणे, छातीमध्ये धडधड होते. एखादी गोळी घेतल्यानंतरही असे होऊ शकते. तर कायमस्वरूपीचा नपुंसकता येऊ शकते. गोळ्याचा सेवन वाढत गेल्यानंतर डोळे, ह्दय, स्मृतीवर परिणाम होऊ शकतो. शुगर, रक्तदाब कमी होऊन हदय बंद पडून मृत्यूही ओढवतो, असेही मुथा यांनी सांगितले.