Download App

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी! सेन्सेक्स अन् निफ्टीनं गाठला ऑल टाईम हाय…

Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Bazar)मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज शेअर बाजारात निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा ऑल टाईम हाय (All time high)गाठल्याचे पाहायला मिळाले. आज बुधवारी ट्रेडिंगच्या सत्रात सेन्सेक्सनं(Sensex) पहिल्यांदाच 72,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीने 21,675 चा नवीन ऑल टाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज ट्रेडिंग दरम्यान हिंदाल्कोचे (Hindalco)शेअर्स 3.93 टक्क्यांच्या वाढीसह 602.65 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. तर टाटा मोटर्स(Tata Motors), टाटा स्टील, एसबीआय लाईफ (SBI Life)आणि इंडसइंड बँकेचे शेअर्सही मजबूत स्थितीत आल्याचे पाहायला मिळाले.

भरवशाचे फलंदाज ढेपाळले, केएलचे झुंझार शतक; पहिला डावात सन्माजनक धावसंख्या

आजच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ झाली आहे. आज शेअर बाजारानं ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे. आज सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 72,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीनंही 21,675 अंकांचा नवा उच्चांक गाठला.

70 एकरावर बांधले जातेय राम मंदिर; कसा आहे नकाशा? मंदिर परिसर कसा असणार?

आज ट्रेडिंगदरम्यान बँक निफ्टीनेही नवीन उच्चांक गाठण्यात यश मिळविलं आहे. आज दिवसभरातील व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 701 अंकांच्या उसळीसह 72,038 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 206 अंकांच्या उसळीसह 21,647 अंकांवर बंद झाला आहे.

आज ट्रेडिंगदरम्यान बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे, 600 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. बँक निफ्टीनंही 48,347 चा नवा उच्चांक गाठला. बँक निफ्टी 1.17 टक्के किंवा 557 अंकांच्या वाढीसह 48,282 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर तेल आणि वायू आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.

आजही मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये वाढ होऊन तर 3 शेअर्स तोट्यावर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्स वाढीसह आणि 10 घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

follow us

वेब स्टोरीज