Share Market Update: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टी 20000 च्या खाली

  • Written By: Published:
Share Market Update: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टी 20000 च्या खाली

Share Market Update: इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारातील सततच्या तेजीला ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात एफएमसीजी समभागांमध्येही घसरण दिसून आली. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून पाठिंबा मिळाला नसता तर बाजारात आणखी मोठी घसरण दिसली असती.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 887 अंकांनी घसरून 66,684 वर आणि निफ्टी 234 अंकांनी घसरून 19,745 अंकांवर बंद झाला. (Indian Stock Market Closes Down In Red After It Stocks Crash Led By Infosys Sensex Fells Below)

क्षेत्राची स्थिती

आजच्या व्यवहारात आयटी शेअर्स सर्वात जास्त घसरताना दिसले. निफ्टी आयटी 1274 अंकांनी किंवा 4.09 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय एफएमसीजी, धातू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यसेवा, तेल आणि वायू, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले. मिड कॅप शेअर्सच्या गतीलाही ब्रेक लागला. तर स्मॉल कॅप शेअर्स तेजीने बंद झाले. सेन्सेक्समधील 30 कंपन्यापैकी 9 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर 21 शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 12 शेअर्स वधारले तर 38 शेअर्स घसरून बंद झाले.

वाढणारे आणि चढणारे शेअर्स

आजच्या व्यवहारात लार्सनचा शेअर्स 3.88 टक्के, एनटीपीसी 1.09 टक्के, एसबीआय 0.78 टक्के, कोटक महिंद्रा 0.70 टक्के, टाटा मोटर्स 0.68 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.13 टक्के वाढीसह बंद झाला. तर इन्फोसिस 8.18 टक्के, एचयूएल 3.65 टक्के, एचसीएल टेक 3.33 टक्के, रिलायन्स 3.19 टक्के घसरले.

गुंतवणूकदारांचे नुकसान

आजच्या व्यवहारात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली. गुरुवारच्या सत्रातील 304.03 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 302.09 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यापारात 1.94 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube