Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण (Share Market Crash) पाहायला मिळाली आहे. बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरु असल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आज सेन्सेक्स (Sensex) जवळपास 1,200 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये (Nifty) आज आयटी शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फटका बसला आहे. आज निफ्टी 364 अंकांनी घसरुण 23587. 50 वर पोहोचला आहे. या घसरणीमागील मुख्य कारणे काय आहे हे जाणून घ्या.
विदेशी गुंतवणूकदार
भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदार (FII) . या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्स बाजारातून 12,230 कोटी रुपये काढले आहे. माहितीनुसार, गुरुवारी 19 डिसेंबर रोजी विदेशी गुंतवणुकदारांनी 4,224.92 कोटी रुपये काढले आहे.
फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेत बदल
तर दुसरीकडे यूएस फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये चलनविषयक धोरणावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे बाजाराचा मूड आणखी बिघडला आहे. पुढील आर्थिक वर्षात बाजाराला तीन ते चार व्याजदर कपातीची अपेक्षा होती मात्र तसं काही झालं नसल्याने बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
नफा बुकिंग
यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक घोषणांनंतर गुंतवणूकदारांना बाजारातील हालचालींमध्ये स्पष्टता दिसत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग केल्याने देखील बाजारात याचा परिणाम झाला आहे. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही आज 2 टक्क्यांनी घसरले.
राही किंवा माही प्रेमासाठी अनुपमा कोणाची करणार निवड करणार? जबरदस्त प्रोमो रिलीज
डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर
एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य शुक्रवारी 85.10 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले. त्यामुळे देखील भारतीय शेअर्स बाजारात निगेटिव्ह परिणाम झाला असून याचा मोठा फटका आता गुंतवणूकदारांना बसला आहे. माहितीनुसार, या वर्षात आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 2% नी घसरला आहे.