‘Share Marketने रचला इतिहास! सेन्सेक्सने गाठलं नवं शिखर, निफ्टीचीही उसळी

Share Market Sensex: देशांतर्गत शेअर बाजारानं आज म्हणजे बुधवार २१ जून २०२३ रोजी एक नवा इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने आपला आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. (Stock Market High) आपला जुना विक्रम मोडण्यासाठी सेन्सेक्सला २०३ दिवसांचा कालावधी लागले. यापूर्वी १ डिसेंबर २०२२ सेन्सेक्सने ६३५८३.०७ ची पातळी गाठून उच्चांकाचा विक्रम केला होता. आज सकाळी […]

Share Market

Share Market

Share Market Sensex: देशांतर्गत शेअर बाजारानं आज म्हणजे बुधवार २१ जून २०२३ रोजी एक नवा इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने आपला आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. (Stock Market High) आपला जुना विक्रम मोडण्यासाठी सेन्सेक्सला २०३ दिवसांचा कालावधी लागले.

यापूर्वी १ डिसेंबर २०२२ सेन्सेक्सने ६३५८३.०७ ची पातळी गाठून उच्चांकाचा विक्रम केला होता. आज सकाळी १० च्या सुमारास ६३५८८.३१ चा स्तर गाठून सेन्सेक्सनं आजवरचा नवं शिखर गाठलं आहे. याअगोदर, शेअर बाजारातील निफ्टीची विक्रमी उच्च पातळी १८८८७.६० होती, जी १ डिसेंबर २०२२ रोजी निफ्टीने गाठली होती. तर सेन्सेक्सने ६३५८३. ०७ ची उच्च पातळी दर्शविली होती.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

सेन्सेक्सने आज ६३५८३ ची उच्च पातळी ओलांडली आणि ६३५८८.३१ या नवीन ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला आणि आता निफ्टीमध्ये किती काळ विक्रमी उच्च पातळी बघायला मिळणार याची बाजार प्रतीक्षा होती. तर दुसरीकडे, सेन्सेक्समधील केवळ १४ शेअर्समध्ये तेजी होती. अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, विप्रो, एल अँड टी आणि हीरो मोटोकॉर्प हे निफ्टी टॉप गेनर्स होते, तर डिव्हिस लॅब, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, सिप्ला आणि सन फार्मा या शेअर्सचा समावेश निफ्टी टॉप लूसर मध्ये होता.

आज अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही या अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस यांच्या शेअर्समध्ये मात्र मोठी घसरण झाली आहे.

Exit mobile version