Download App

शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रो टेक्लिकल पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

  • Written By: Last Updated:

Shipping Corporation of India Limited Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे  इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 30 जागा भरण्यात येणार आहेत. या पद भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात (ई-मेल पध्दतीने). भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्जाची अंतिम तारीख याबद्दल तपशीलवार अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पात्र उमेदवारांनी शिपिंग कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्ज करताना 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

सरकारी नियमांनुसार शिपिंग कॉर्पोरेशनमधील या भरतीसाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते. तपशील विवरणपत्रात दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कारण अर्जात काही त्रुटी आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.

एकूण पदांची संख्या – 30

पदाचे नाव – इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ऑफिसर

वयोमर्यादा – 65 वर्षे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

खासदार होण्याची पूर्वी इच्छा होती; शाहू महाराजांच्या विधानानं सस्पेन्स वाढला

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल आयडी – fleet.appriasal@sci.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1axrwW38UIW1mwSN0M3wUdHBW1KvZH3o8/view

अधिकृत संकेतस्थळ –
http://www.shipindia.com

असा अर्ज करा-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करावा लागेल.
उमेदवारांनी fleet.appraisal@sci.co.in या ईमेल आयडीवर त्यांचा सीव्ही सबमिट करावा.
अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल. अपूर्ण अर्ज भरल्यास अपात्र ठरवला जाईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

Tags

follow us