खासदार होण्याची पूर्वी इच्छा होती; शाहू महाराजांच्या विधानानं सस्पेन्स वाढला

खासदार होण्याची पूर्वी इच्छा होती; शाहू महाराजांच्या विधानानं सस्पेन्स वाढला

Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र शाहू महाराज छत्रपती यांनी मला यापूर्वी लोकसभा लढवण्याची इच्छा होती असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर सर्वसमावेशक उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 25 ऑगस्टला कोल्हापूरच्या दसरा चौक मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भूषवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रीमंत शाहू महाराजांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की कार्यक्रमाला मी जाणार आहे हे जाहीर झालेले आहे. लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा कशी सुरु झाली हे माहिती नाही. राष्ट्रवादीकडून लोकसभेची इच्छूक आहात का? यावर ते म्हणाले की राष्ट्रवादीकडून नाही तर यापूर्वी खासदार होण्याची माझी इच्छा होती. शाहू महाराजांच्या या विधानामुळे उमेदावारीचा सस्पेन्स वाढला आहे.

वरिष्ठांना नाहीत तर जिल्ह्यातील काही लोकांना एजंट म्हणालो, रोहित पवारांचे स्पष्टीकरण

महाविकास आघाडीकडून जिल्हातील दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसकडून मागणी केली जात आहे पण राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीच थेट कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास सर्व समावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

https://youtu.be/vc2k2IIshT0

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube