ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी

ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी

Chhagan Bhujbal on Sambhaji Bhide : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. काही दिवसांपूर्वीचं त्यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं होतं. महापुरुष, ऐतिहासिक घटना, तिरंगा ध्वज, राष्ट्रगीत याबाबत कायम वादग्रस्त विधानं करणाऱ्या भिडेंवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार टीका केली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी आणि संभाजी अशी नावं ठेवली जात नाहीत, असे म्हणत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या ‘समाज दिन’ कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, काही लोक म्हणतात की तुम्ही इकडे-तिकडे गेला आहात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव हे मनोहर कुलकर्णी आहे. पण प्रत्यक्षात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी नाव बदलवलं. खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. पण, कोणत्याही ब्राह्मणाच्या घरात कोणीही शिवाजी, संभाजी हे नावं कोणी ठेवत नाही. हा माणूस उठतो आणि कोणावरही टीका करतो. म्हणूनच इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

वरिष्ठांना नाहीत तर जिल्ह्यातील काही लोकांना एजंट म्हणालो, रोहित पवारांचे स्पष्टीकरण 

ते म्हणाले, आपला इतिहास राजेशाही क्रांतिकारकांपासून सामाजिक क्रांतिकारकांपर्यंत आहे, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आम्ही सरकारमध्ये का सामील झालो ते मी आधीच सांगितले आहे. महात्मा फुले म्हणाले होते की, सत्तेविना झाल्या सर्व कळा झाल्या अवकळा. सत्ता असेल तरच तुम्ही काहीतरी समाजसाठी करू शकता. अन्यथा समाजाविषय़ी कितीही कळवला असला तरी काही करू शकत नाही. बाबासाहेबांनी देखील सांगिलतं होत शिका आणि सत्तेत सहभागी व्हा. बाबासाहेब सत्तेत सामील झाले आणि आपल्याला संविधान मिळालं, असं भुजबळ यांनी सांगिलंत.

भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे विचार रुजवले. महात्मा फुले बहुजन समाजाला शिक्षण मिळावं,यासाठी शाळा काढल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील आणि नंतर रावसाहेब थोरात यांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली. पण कुणाला सरस्वती, शारदा आवडते. पण आम्ही काही यांना कधी पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. पण, आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं ते शाहु-फुले-सावित्रीबाई-कर्मवारी या लोकांनी दिलं म्हणून ते तेच माझे देव आहेत. तेच देव तुमचे असले पाहिजेत, असं भुजबळ म्हणाले.

जमीन खरेदी योजनेतून 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अनेक योजना अजित पवार तिथल्या तिथं पार पाडत आहेत. निवडणुकीच्या काळात काहीही करा. तरीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या. सरकार आज जी सबसिडी देत ​​आहे, ती मेहरबानी नाही. कारण पूर्वी शिवाजी महाराजांसारखे राजे असताना ते अशा कामात मदत करायचे. आता सरकार राजे झालेत तर जनतेला मदत करणं हे त्यांचं कामच आहे, असं भुजबळ म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube