वरिष्ठांना नाहीत तर जिल्ह्यातील काही लोकांना एजंट म्हणालो, रोहित पवारांचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
Rohit Pawar

Rohit Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरांवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका मुलाखतीत जहरी टीका केली होती. सर्वोच्च नेतृत्वात काही एजंट होते. ते एजंट राष्ट्रवादीतून (ncp) बाहेर पडलेत. आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल, असे म्हटले होते. त्यामुळे रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. राजकीय पोळी भाजणारे पुन्हा आले तर आम्ही घेणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

रोहित पवार म्हणाले की मी एका मुलाखतीत बोलताना जिल्हा पातळीवरील विषयाबद्दल बोललो होतो. पण त्यांच्याकडून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांबद्दल असे लिहिले गेले असावे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असे काही नेते होते की अजितदादा (Ajit Pawar), पवारसाहेब (Sharad Pawar) किंवा इतर नेत्यांभोवती पुढं पुढं करायचे. आणि यामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचू देत नव्हते, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले.

शिंदे, राणेंसह 50 आमदार मध्य प्रदेशमध्ये; जय-पराजयाचे गणित ठरविण्यासाठी मोठी जबाबदारी

ते पुढं म्हणाले की मी वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोललो नाही. जिल्ह्यांतील लोकल नेते हे त्या गटाकडे गेले आहेत. आता जे पक्षात निष्ठावंत राहिले आहेत, ज्यांना ताकद मिळत नव्हती अशा नेत्यांना आता खऱ्या अर्थाने ताकद मिळत आहे. यातूनच आमचे सर्वाधिक आमदार निवडून येतील याचा मला विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंवर ठाकरेंचा पुन्हा डाव, शिर्डीच्या मैदानात उतरविणार!

राष्ट्रवादीचा सर्वात मोठा आकडा 72 होता. शरद पवार यांची लोकप्रियता आणि पक्षाचे काम बघता हा आकडा 100 च्या पुढं जायला पाहिजे होता. पण प्रत्येक जिल्हात आणि विभागात ठरलेले नेते होते. त्यांच्यामुळे तरुणांना पुढं जात येत नव्हते. नवीन पदाधिकाऱ्यांची फळी तयार होत नव्हती. त्याकाळात असा लोकांकडे दुर्लक्ष झालं. राष्ट्रवादीतील या घटनेमुळे ते लोक बाजूला गेले आहेत आणि नवीन नेत्यांना संधी मिळत आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us