शिंदे, राणेंसह 50 आमदार मध्य प्रदेशमध्ये; जय-पराजयाचे गणित ठरविण्यासाठी मोठी जबाबदारी
आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने् कंबर कसली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच भाजपने 39 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. याशिवाय आता भाजपने इतर राज्यातील आमदारांना या निवडणुकीच्या कामासाठी मध्यप्रदेशात पाठविले आहे.
भाजपने महाराष्ट्रातील आणि बिहारमधील आमदारांना मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी भोपाळला पाठविले आहे. मध्यप्रदेशमधील तब्बल 46 विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने महाराष्ट्रातील सुमारे 50 आमदारांना मैदानात उतरवलं आहे. आमदार राम शिंदे, संतोष दानवे, नितेश राणे, नारायण कुचे यांच्यासह 50 आमदार हे आज मुंबईहून रवाना झाले. (BJP has sent MLAs from Maharashtra and Bihar to Bhopal to work for the Madhya Pradesh assembly elections.)
‘माझं काम केलं नाही तर बुटाने मारून हाकलून देईन’; माजी आमदार कार्यकर्त्यांवरच भडकले
आमदारांवर काय जबाबदारी असणार?
मिळालेल्या माहितीनुसार, हे आमदार मध्यप्रदेशमधील 46 विधानसभेच्या जागेवरून दावेदारांचे पॅनल तयार करून याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सादर करणार आहेत. यासोबत संबंधित मतदारसंघातील निवडणूक कशी आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर लढवायची हेही ठरविण्याची जबाबदारी असणार आहे. याशिवाय विचार परिवार समन्वय बैठक, लाभार्थी संपर्क अभियान, विधान सभा स्तरिय अनाथलय भेट. वृद्धाश्रम दौरा, युवकांसोबत बातचीत, सोशल मीडियावरील चर्चा, पत्रकार परिषदा आणि मंडल स्तरिय बैठकाही घेण्यात येणार आहेत. याबाबतचे या आमदारांचे एक प्रशिक्षणही पार पडले आहे.
Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांची सभा होणारचं; धनुभाऊंनी ठासून सांगितलं
कोणत्या आमदारावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी असणार?
1) जयकुमार रावल – नागोद विधानसभा
2) मंगेश चव्हाण – कसरावद विधानसभा
3) देवयानी फरांदे – देवास विधानसभा
4) संजय कुटे – नेपानगर विधानसभा
5 रणधीर सावरकर – भैंसदेही विधानसभा
6) राम शिंदे – जुन्नारदेव विधानसभा
7) रणजितसिंह मोहिते पाटील – अमरवाडा विधानसभा
8) श्वेता महाले – जबलपूर पश्चिम विधानसभा
9) नितेश राणे – बछीया विधानसभा
10) प्रवीण दरेकर – जबलपूर कॅन्ट विधानसभा