‘माझं काम केलं नाही तर बुटाने मारून हाकलून देईन’; माजी आमदार कार्यकर्त्यांवरच भडकले
Beed News : राज्यात आता निवडणुकांचे वारे वेगाने वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून तिकीटासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. बीडमध्येही (Beed) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
माजी आमदार बदामराव पंडित यांनी तर कार्यकर्त्यांना तंबीच देऊन टाकली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित (Badamrao Pandit) इच्छुक आहेत. त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले मात्र वादग्रस्त स्टाईलमध्ये. एक प्रकारे आदेश न देता तंबीच दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
‘अमरसिंह पंडितला कुणीही घाबरायचं नाही. त्याचा फोनही कुणी उचलायचा नाही. त्यांच्याशी कुणीही गोड बोलायचं नाही. तीस वर्षे मी तुम्हाला सांभाळलं. आता गरीब कार्यकर्त्यावर दडपण आणू पाहत आहे. पण, तो काहीही करू शकत नाही. हे खात्रीने सांगतो. त्याचा फोन कुणी उचलायचा नाही आणि उचलला तर सांगायचं की मी बदामराव पंडितचा कार्यकर्ता आहे. तुझा कार्यकर्ता नाही. माझ्या पाठीमागे बदामराव पंडित आहेत, अस सांगायचं.’
सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत ठाकरे गट पुरविणार रसद; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
‘तो जर काही बोलला तर मला सांगा. तुम्ही काहीच काळजी करू नका. आगामी काळातील निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका आता आहेत. विधानसभेचीही निवडणूक आहे. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचं फळ आपण पदरात घेत नाहीत तोपर्यंत कुणीच आराम करायचा नाही. सगळ्यांनी स्वतःहून काम करायचं. जो कुणी माझं काम करणार नाही त्याला माझ्या बंगल्यात बुटाने मारून मी बाहेर हाकलून देईन, हे लक्षात ठेवा.’
‘तुम्ही सुद्धा मला सांगा कोण चुकारपणा करत आहे? त्याच्याकडे मी बघतोच. माझा पण चाळीस वर्षांचा अभ्यास आहे. गेटजवळ कोणता माणूस कशासाठी आला आहे हे मला सुद्धा चांगलं कळतं. त्यामुळे मी दोन्ही हात जोडून विनंती करतो की आता सगळे जण निवडणुकीसाठी कामाला लागा’, अशा शब्दांत पंडित यांनी कार्यकर्त्यांनाच तंबी दिली.
‘महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा’; काँग्रेस नेत्याचं भन्नाट ट्विट