Small Saving Rate Hike: व्याजदर वाढले, सरकारकडून मोठे गिफ्ट

Small Saving Rate Hike: उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यापूर्वीच सरकारकडून छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग स्किम, किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेतील व्याजदर वाढले आहे. आर्थिक वर्षातील एप्रिल आणि जूनच्या बचत योजनेवरील व्याजदर 10 ते 70 बेसिक पाँइटने […]

WhatsApp Image 2023 03 31 At 6.58.39 PM

WhatsApp Image 2023 03 31 At 6.58.39 PM

Small Saving Rate Hike: उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यापूर्वीच सरकारकडून छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग स्किम, किसान विकास पत्र, पोस्टाच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेतील व्याजदर वाढले आहे. आर्थिक वर्षातील एप्रिल आणि जूनच्या बचत योजनेवरील व्याजदर 10 ते 70 बेसिक पाँइटने वाढविण्यात आले आहे. परंतु भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात बदल करण्यात आलेले नाही. अर्थ मंत्रालयाने आज हे जाहीर केले आहे.

कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित

सर्वाधिक व्याज हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर (राष्ट्रीय बचत पत्र) वाढविले आहे. आता हे व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.70 टक्के करण्यात आली आहे. तर गेल्या काही महिन्यात सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात बदल करण्यात आले नव्हते. या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6 टक्कांवरून आठ टक्के करण्यात आले आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.2 टक्के वाढून 7.5 टक्के करण्यात आले आहे. मॅच्युरिटीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. हा कालावधी 120 महिन्यांवरून 115 महिने करण्यात आला आहे.

दह्यामुळे कानडी, तमिळांची सटकली.. विरोध इतका की मुख्यमंत्रीही मैदानात

बचत योजनेत एका वर्षासाठी 7 टक्के, दोन वर्षांसाठी 6.90 टक्के, तीन वर्षांसाठी 7 टक्के, पाच वर्षांसाठी 6.20 टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवर 8.20 टक्के, राष्ट्रीय बचत पत्रावर 7. 70 टक्के, किसान विकास पत्रावर 7. 5 टक्के (115 महिने ) व्याजदर मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर आठ टक्के व्याज मिळणार आहे.

Exit mobile version